वाहनाचा पाठलाग करीत वरोरा पोलिसांनी पकडला अवैध दारुसाठा.

56

वाहनाचा पाठलाग करीत वरोरा पोलिसांनी पकडला अवैध दारुसाठा.

22 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनाचा पाठलाग करीत वरोरा पोलिसांनी पकडला अवैध दारुसाठा.
वाहनाचा पाठलाग करीत वरोरा पोलिसांनी पकडला अवैध दारुसाठा.

️मनोज खोब्रागडे️, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर (वरोरा):- सविस्तर माहिती याप्रमाणे आहे की,24 एप्रिलच्या पहाटे गुप्त माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांनी विदेशी दारुसहित एकूण 22 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहाटे 3 वाजताच्या दरम्यान पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना मुखबिर मार्फत चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचत वाहनांची वाट बघितली असता काही वेळात संशयित रित्या विना नंबरप्लेट असलेली चारचाकी वाहन टेम्भूर्डा – चंद्रपूर मार्गावरून येताना दिसले पोलिसांनी त्या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनाचा वेग वाढवीत वाहन चालक चंद्रपूरच्या दिशेने निघाला.

तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या चारचाकी वाहनाने फिल्मी स्टाईलने विना नंबरप्लेट असणाऱ्या अशोक लिलेंड कम्पणीच्या वाहनाचा पाठलाग केला असता बोर्डा चौक वरोरा येथे ते वाहन थांबविले मात्र अंधाराचा फायदा घेत वाहनचालक पळून गेला.

पोलिसांनी सदरील गाडीची चौकशी केली असता त्यामध्ये विदेशी दारूचा अवैध साठा आढळला, सदरील अवैध दारूची एकूण किंमत 18 लाख 43 हजार 200 सहित चारचाकी वाहन किंमत 4 लाख असा एकूण 22 लाख 43 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अंधाराचा फायदा घेत पळून गेलेल्या वाहन चालकविरोधात महाराष्ट दारूबंदी कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.