जोगेश्वरीत प्रभाग क्रमांक ७७ मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

जोगेश्वरीत प्रभाग क्रमांक ७७ मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

जोगेश्वरीत प्रभाग क्रमांक ७७ मध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन

पूनम पाटगावे ✍
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
8149734385

जोगेश्वरी (मुंबई ): – आज दिनांक २४ एप्रिल २०२२ रोजी जोगेश्वरी येथील शिवसेना शाखा क्रमांक ७७ मधील न्यू षटकार क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने मेघवाडी येथे विभागातील नागरिकांसाठी रक्त चाचणी आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्र आमदार/ माजी राज्यमंत्री मा. श्री. रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले. प्रभाग क्रमांक ७७ चे शिवसेना नगरसेवक आणि सुधार समिती सदस्य मा. श्री. अनंत (बाळा) नर यांच्या नेतृत्वाखाली आणि न्यू षटकार क्रीडा मंडळाच्या सौजन्याने तेथील विभागातील नागरिकांसाठी रक्त चाचणी घेण्यात आली.
या आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह, क्रिएटीनीन, कोलेस्टेरॉल आणि थायरॉईड या रक्त चाचणी घेण्यात आल्या. या रक्त चाचण्या फक्त ९९ रुपयात करण्यात आल्या. यातील मधुमेह, क्रिएटीनीन, कोलेस्टेरॉल या तिन्ही रक्त चाचण्या केल्यानंतर थायरॉईड हि रक्त चाचणी मोफत करण्यात आली. या शिबिराचा कालावधी सकाळी ७ ते दुपारी १२ असा ठेवण्यात आला. अत्यंत अल्प दरात रक्त चाचणी उपलब्ध असल्यामुळे विभागातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबारामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग होता.
आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी युवासेनाचे जोगेश्वरी विभाग अधिकारी/ सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक श्री. अमित पेडणेकर, शाखा समन्वयक श्री. उदय हेगिष्टे, श्री. महेश पडवळ, उपशाखाप्रमुख श्री. युसूफ दुल्हारे, शाखा संघटक श्री. निलेश बाईत, सोशल मीडिया समन्वयक श्री. आदित्य घाटगे, न्यू षटकार क्रीडा मंडळाचे सचिव व शिवसेना गटप्रमुख श्री. योगेश मणियार, शाखेचे अध्यक्ष श्री. आदित्य थेराडे आणि सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.