आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागाने कोविडलसीकरण मोहीम यशस्वी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार धाड येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचेउद्घाटन व आरोग्य शिबिर

आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागाने कोविडलसीकरण मोहीम यशस्वी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

धाड येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचेउद्घाटन व आरोग्य शिबिर

आरोग्य यंत्रणेच्या सक्रिय सहभागाने कोविडलसीकरण मोहीम यशस्वी : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार धाड येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचेउद्घाटन व आरोग्य शिबिर

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016

बुलडाणा : – भारतात कोरोनाचे 187 कोटी लसीकरण करण्यात आले आहे. ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीमआहे. कठीण परिस्थितीवर मात करत मोठ्या प्रमाणावर लसीकरण हे केवळ वैद्यकीययंत्रणेने सतत घेतलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे लसीकरण मोहिम यशस्वी होऊ शकलीआहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारयांनी आज केले. धाड ता. बुलडाणा येथे ग्रामीण रूग्णालयात आयोजितआरोग्य मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, सरपंच सावित्रीबोर्डे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह विजयराज शिंदे, देवीदास पाटील आदी उपस्थित होते. सुरूवातीला धाड येथील ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीयआरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच याठिकाणीआयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, देशात चार हजार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळेयेत्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही. कोरोनाच्या काळात शासनाने कोणालाही वाऱ्यावर सोडले नाही. लॉकडाऊन कालावधीत नागरिकांना घरपोच राशन दिले गेले. जनधन,शेतकरी सन्मान योजना, उज्वला योजना, तसेच आरोग्याच्या विविध योजना राबविल्यामुळेकठीण परिस्थितीतही नागरिकांचे जीवन सुखी झाले. त्या पुढे म्हणाल्या, मोफत लसीकरणाची मोहीमहाती घेण्यात आल्यानंतर आरोग्य यंत्रणा आणि आशा कार्यकर्त्यांमुळे गावापर्यंत शासनपोहोचू शकले. सध्या 12 वर्षावरील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. लसीकरणाचेकार्यक्रम यशस्वीपणे घेऊन आरोग्य सेवा देण्यासाठी यंत्रणेने सतत प्रयत्नशील असावे.आज शासन ई-संजीवनी आणि मोफत औषधांच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा देत आहे. आरोग्यसेवा ही मानवतेची सेवा आहे, ही जाणीव ठेवून कार्य करण्यात येत आहे. धाड येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स रेची मागणीपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करण्यातआलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पामुळे येथील नागरिकांना सुविधा मिळाली आहे, असेहीडॉ. पवार यांनी सांगितले. आमदारश्वेताताई महाले यांनी आरोग्य यंत्रणेने उत्कृष्ट कार्य केले. त्यामुळे कोरोनाच्यालाटांवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. येत्या काळात महिलांमध्ये वाढीस असलेल्या गर्भाशय कर्करोगावरील लसीकरण अभियान राबविण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी डॉक्टरफोर यू च्या डॉ. वैशाली वेणू, देविदास पाटील, सुनील देशमुख, विजयराज शिंदे यांनीमनोगत व्यक्त केले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यातआले. तसेच डॉक्टर फोर यू च्या डॉ. वैशाली रेणू आणि साकेत झा यांचा मानचिन्ह देऊनसत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला धाड भागातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.