जिवंत विजेच्या तारांमुळे येणारे मृत्यू म्हणजे एक प्रकारची शोकांतिका…!

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

मो: ७८२१८१६४८५

      माणसे असोत किंवा मुके प्राणी असोत या, पृथ्वीतलावर कायमचे ते निवासी नसतात. जन्म आहे सोबतच मृत्यू सुद्धा निश्चितच ठरलेला असतो. व आजपर्यंत तो कोणालाही चुकला नाही कारण, निसर्गाचा तो नियमच आहे. याचा सर्वांनी स्वीकार करायला पाहिजे. यामध्ये दररोज कोणी अपघातात मरण पावतात तर..कोणी दारू पिऊन मरण पावतात, कोणी उपाशी मरण पावतात तर…कोणाकडे पैशाची सोय नसल्यामुळे व कोणी मदत न केल्याने बिना उपचाराने मरण पावतात, एखाद्या वेळी विजेचा कडकडाट झाला की, वीज पडल्याने मरण पावतात प्रत्येकांचे मृत्यू होणे किंवा येणे हे वेगवेगळे असतात. आपण सर्वजण चांगल्याप्रकारे जाणूनच आहोत पण तिथेच नाहकच कोणाच्या मृत्यूचे कारण बणने हे तर..योग्य नाही. व कोणत्याही माणसाचे हे कर्तव्य सुध्दा नाही माणसाला वाचवणे हा माणुसकी धर्म आहे मारणे माणुसकी धर्म नाही. याचा प्रत्येकांनी अभ्यास करायला पाहिजे. 

    एखाद्याची काहीही चूक नसताना नाहकच इतर गोष्टींमुळे मृत्यू येत असेल तर. ..याला आपण काय म्हणावे…? बरेचदा आपण वृतपत्रात किंवा टेलिव्हिजनवर येणाऱ्या बातम्यांमध्ये वाचले असणार, ऐकले असणार. ..किंवा त्या ठिकाणी घडलेल्या दुदैवी घटनेच्या ठिकाणी जाऊन बघितले असणार. .ती, घटना म्हणजेच वास्तव स्वरुपात असलेली व शासनाच्या हलगर्जीमुळे होणारी जिवीतहानी व नाहकच गोर, गरीबांचा, बळीराजाचा, मोलमजुरी करणाऱ्यांचा, कामगारांचा व मुक्या प्राण्यांचा मृत्यू जिवंत विजेचा ताराच्या स्पर्श होऊन जात जात असेल तर. .आपण दोष कोणाला द्यावे. ..?आजपर्यत बरेचदा जिवंत तारा समीनीवर पडल्यामुळे व त्यातून झालेल्या स्पर्शाने बरेच लोकांचे तसेच मुक्या प्राण्यांचे जीव गेलेले आहेत. अशा दुर्देवी घटना होणे हि एक प्रकारची शोकांतिकाच म्हणावे लागेल. ..आपण आजपर्यंत अशा अनेक घटना वाचले असणार किंवा वाचण्यात आले असतील यात काही शंका नाही. एवढेच नाही तर..अशा प्रकारच्या घटना गोर, गरीब, बळीराजा, मोलमजुरी करणारे तसेच मुक्या पाळीव प्राण्यांच्या बाबतीत घडत आहेत. अशा घटना, घडताना बघून शासन या घटनांकडे लक्ष का देत नाही हा अनेकांना पडलेला भारी प्रश्न आहे. 

      दु:ख एका गोष्टीचं वाटतो की, जगाला पोसणाऱ्या बळीराजाच्या पिकाला वाचविण्यासाठी पूर्ण वीज पुरवठा मिळत नाही व वीजबील गगणात जाऊन भिडलेला दिसतो वरतून निसर्ग ही कोपत आहे शासनही पूर्णपणे लक्ष देत नाही, पिकलेल्या मालाला पाहिजे तेवढा भाव मिळत नाही मग एवढा वीजबिल त्याने कुठून भरावे…?या कडे शासनाची पाहिजे तेवढी लक्ष नाही एवढेच नाही तर..जिवंत विजेच्या पडलेल्या तारांमुळे होत असलेल्या स्पर्शाने अनेकांचे जीव जात आहेत,कित्येक गेले आहेत. सोबत गाय, बैल, म्हसी, शेळ्या, मेंढ्याचा सुद्धा जीव गेलेला आहे एवढे सारे नुकसान होताना सुद्धा याकडे खरच कोणी लक्ष द्यावे. ..? यामध्ये बळीराजा, गोर, गरीब, पाळीव प्राणी तसेच मोलमजुरी करणाऱ्यांचा जीव जात आहे. असेच जर…वारंवार होत राहिले तर. .मोलमजुरी करणारे, गोर,गरीब काय खाऊन जगावे..? व बळीराजाने काम तरी कसे करावे. .? पाळीव प्राण्यांनी कुठे जाऊन पोट भरावे..? आधीच त्यांची संख्या घटत चाललेली आहे. जिथे, तिथे संकटांच्या डोंगरापायी त्यांच्या जीवनात अंधार दिसत आहे . आशेचा किरण कधी त्यांच्या जीवनात येईल की, नाही माहीत नाही आजही एवढ्या घटना घडत असताना सुद्धा काही ठिकाणी विजेच्या डिपीला कुलूप लावलेला दिसून येत नाही. याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कारण बरेचदा लहान मुले खेळत असताना त्या उघड्या डिपीकडे जाऊ शकतात अशा दुर्दघटना होण्या आधीच काळजीपूर्वक लक्ष दिले तर…मुळात अशा घटना, घडताना दिसणार नाही. त्याच प्रमाणे जमीनीवर पडलेल्या जिवंत तारामुळे स्पर्श होऊन कोणी मृत्यूच्या दारात जाणार नाही या,सर्व महत्वाच्या गोष्टींकडे शासनाने लक्ष देणे अत्यंत काळाची गरज आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here