जळगावचा श्री.प्रदिप पाटील या अवलियाने सुरू केले वाढदिवसानिमित्त बाल वाचनालय

जळगांव प्रतिनिधी

खंडू महाले

मो.7796296480

जळगाव दि:२३एप्रिल २०२३ रोजी जळगाव पिंपराला येथील श्री. प्रदिप पाटील हा तरुण मागील बारा वर्षा पासून सामाजिक , शैक्षणिक वैद्यकीय क्षेत्रात उत्तम कार्य करीत आहे , राहत्या घरीच त्यांच्या झोपडीतच त्याने वस्तीतील मुलांना शिक्षणाचे महत्त्व पठवत वर्ग सुरू केला , आणि त्याच वर्गाचा विद्यार्थी सागर वरपे आज डी. आय. डी. शो मध्ये संपूर्ण देश भरात आपल्या जळगाव चे नाव करीत आहे , तो विद्यार्थी ही या अवलियाने घडविला आहे , असे अनेक विद्यार्थी घडवण्याचे कार्य या तरुणाने केले आहे , तसेच आजतागत केशव स्मुर्ती प्रतिष्ठान च्या समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर हरविलेल्या दिशाहीन झालेल्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणून त्यांच्या परिवाराशी जोडण्याचे कार्य करीत आहे , त्याच बरोबर अनेक युवक पोलीस भरती करतात , पण काही कारणाने भरती होत नसतात व आत्महत्या कडे वळतात , असल्या मुलांसाठी या युवकाने ( MCF फोर्स ) मातृभूमी कमांडो फोर्स सुरू करून या मुलांना आपत्ती प्रशिक्षण देऊन पोलीस प्रशासना सोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचे कार्य करीत आहे , तसेच हे करता करता पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे msw ला प्रथम वर्षाला शिकत आहेत ,  

               आज त्या अवलिया तरुणाचा वाढदिवस त्यांचा वाढ दिवसावर त्यांनी कुठलाही खर्च न करता , टरबूज कापून साध्या पध्दतीने वाढ दिवस साजरा केला. त्यांनी त्यांच्या वाढ दिवसा निमित्ताने व जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने झेप घेणाऱ्या पंखांना ज्ञानाचे बळ देणारी पुस्तके जीवनात सप्तरंगही उधळतात. जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर 50 रुपयात जेवण व 50 रुपयाच पुस्तक ग्यावे. या विचारातील प्रदिप या तरुणाने वस्तीतील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. या उद्देशाने बाल वाचनालय सुरू केले , तसेच जमलेल्या बालकांना शिक्षणाचे महत्व पटवून उजळणीचे, गोष्टीचे पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप केले .

              बालकांना वाचण्यासाठी 150 पेक्षा जास्त पुस्तक त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत . त्यांच्या मातोश्री शोभाबाई पाटील यांच्या हस्ते वाचनालयाला सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील गोकुळ पाटील , त्यांची मिसेस वर्षा पाटील , त्यांचे लहान बंधू नितीन पाटील , कमांडो फोर्सचे दीपक महाले , पुरथ्वीराज पाटील , तसेच बालकांसोबत पालक ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here