दहावी, बारावीचे निकाल जाहीर होणार या दिवशी, विद्यार्थ्यांना या कारणामुळे मिळणार घरपोहोच प्रगतीपुस्तकं !!
जितेंद्र कोळी
पारोळा प्रतिनिधी
मो: 9284342632
दहावी-बारावीच्या परीक्षेला बसलेल्या तब्बल ३२ लाख विद्यार्थ्यांचे ९० टक्के पेपर आतापर्यंत तपासून पूर्ण झाले आहेत. पहिल्यांदा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होणार असून या विद्यार्थ्यांचा निकाल ५ जूनपूर्वी जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर इयत्ता दहावीचा १५ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. पुणे बोर्डाने त्यादृष्टीने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. दोन्ही निकाल जूनमध्येच लागणार आहेत, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. दररोज तापमान सरासरी ४० सेल्सिअंशपर्यंत आहे. दरवर्षी १ मे रोजी शाळांचे निकाल प्रसिद्ध होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांना शाळांमध्ये बोलावून त्यांची प्रगतीपुस्तके दिली जातात. पण, खारघर घटनेनंतर आरोग्य विभागासह शालेय शिक्षण विभागाने शाळांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळांमधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना प्रगतीपुस्तके पोच करतील, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर, १ मेऐवजी आता २९ एप्रिलपर्यंत किंवा १ मेनंतर उन्हाळा सुटीत त्यांच्या सोयीने प्रगतीपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोच करतील. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा आहेत. त्याअंतर्गत दोन लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तेवढ्या विद्यार्थ्यांना यंदा प्रथमच घरपोच प्रगतीपुस्तके मिळणार आहेत. दरम्यान, उष्माघातामुळे १२ जूनऐवजी १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत.
दरम्यान, पहिली ते पाचवीसाठी २०० दिवस तर सहावी ते आठवीसाठी २२० दिवस अध्यापन होईल, यादृष्टीने पुढे शिक्षणाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असेही शालेय शिक्षण विभागाने आदेशातून स्पष्ट केले आहे.