सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू

52

सर्पदंशाने विवाहितेचा मृत्यू

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो:8830857351

भद्रावती,२३ एप्रिल: विषारी सापाने दंश केल्यामुळे एका विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तालुक्यातील चोरा या गावी घडली. प्रतिभा विलास आसुटकर (३०) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजता घरी झोपली असताना टवऱ्या महाडोर या प्रजातीच्या सापाने प्रतिभाला दंश केला. तिला लगेच भद्रावती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिला चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेही सुधारणा न झाल्याने नागपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

परंतु प्रतिभाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तीची प्राणज्योत मालवली. दरम्यान, दंश करणाऱ्या सापाला डाल्याने झाकून ठेवण्यात आले. त्यानंतर सर्पमित्रांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

तिच्या पश्चात पती, सासू, मुलगा, मुलगी, दीर आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. प्रतिभाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.