विजेचा शॉक लागून दुर्मीळ शिखारा पक्ष्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून दुर्मीळ शिखारा पक्ष्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून दुर्मीळ शिखारा पक्ष्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून दुर्मीळ शिखारा पक्ष्याचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

अहेरनवरगाव : 24 एप्रिल
उंच आकाशात उडत असतानाच जमिनीवरील भक्ष टिपण्याचे काम काही पक्षी करीत असतात. असाच काहीसा प्रकार एका शिखारा या पक्ष्याच्या जिवावर बेतला. विद्युत खांबाच्या तारेला लटकून असलेल्या वटवाघुळ या पक्ष्याची शिकार करण्यासाठी उंच आकाशात उडणार्‍या शिखारा या पक्ष्याने विद्युत खांबाच्या तारेला लटकून असलेल्या वटवाघुळ या पक्ष्यावर झडप घेतली आणि विद्युत करंट लागून जमिनीवर पडून मृत्यू पावला. अगोदरच वाढत्या तापमानामुळे, वातावरणाच्या बदलामुळे कावळे, चिमण्या, घार, गिधाड व इतर अन्य पक्षी यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि त्यातच शिकार करणार्‍या शिकारी पक्ष्यांचीसुद्धा संख्या अशी कमी होत असल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे.