माणगांव तालुक्यातील उतेखोल वाडी येथे सालाबाद प्रमाणे हनुमान जयंती उत्साहात साजरी

माणगांव प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्यूज

माणगांव :-श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, धार्मिक कार्यक्रम, कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील तसेच गांवोगावी विविध मंदिरांमध्ये आज दि.23 एप्रिल रोजी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

हनुमान जन्मोत्सवानिमित्त उतेखोलवाडी येथे नवतरुण मंडळाच्या वतीने दिवसभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी रुद्राभिषेक, दुपारी जन्मोत्सव आणि संध्याकाळी महाप्रसाद देण्यात आला. या वेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्त तसेच ग्रामस्थ मोठयासंख्येने उपस्थित होते. हनुमान जयंती निमित्त ग्रामस्थांनी उतेखोल वाडी येथून पालखी मिरवणूक खालू बाजाच्या ठेक्यावर तसेच हरीनामाच्या गजरात लहान थोर तसेच महिला मंडळानी मोठया सख्येनी उपस्थिती दाखवली…