चंद्रपूर जिल्ह्यात सापडली तब्बल 25 हजार वर्षापूर्वीच्या आदिमानवांच्या वापरातली अवजारे • अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा • भोयेगावजवळ सापडली अश्मयुगीन अवजारे

चंद्रपूर जिल्ह्यात सापडली तब्बल 25 हजार वर्षापूर्वीच्या आदिमानवांच्या वापरातली अवजारे • अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा • भोयेगावजवळ सापडली अश्मयुगीन अवजारे

चंद्रपूर जिल्ह्यात सापडली तब्बल 25 हजार वर्षापूर्वीच्या आदिमानवांच्या वापरातली अवजारे

• अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा
• भोयेगावजवळ सापडली अश्मयुगीन अवजारे

चंद्रपूर जिल्ह्यात सापडली तब्बल 25 हजार वर्षापूर्वीच्या आदिमानवांच्या वापरातली अवजारे • अभ्यासक सुरेश चोपणे यांचा दावा • भोयेगावजवळ सापडली अश्मयुगीन अवजारे

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

चंद्रपूर : 24 एप्रिल
कोरपना तालुक्यातील वर्धा नदीच्या किनारी भोयेगावजवळील शेती आणि जंगल परिसरात 25 हजार वर्षांदरम्यानच्या मध्यपाषाण युगातील आदिमानवांची अवजारे सापडली आहेत. जिल्ह्यात यापूर्वीदेखील अनेक ठिकाणी अशी अवजारे आढळून आली. कोरपना तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची मध्याश्मयुगीन अवजारे मिळाली आहे, असा दावा भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली आहे.
भोयेगाव येथे आढळलेली ही अवजारे आर्कीयन काळातील रुपांतरित खडकापासून बनवलेली असून, त्यात अर्ध मौल्यवान समजल्या जाणार्या जास्पर अगेट, क्वार्ट्झ या खडकांचा समावेश आहे. विदर्भ आणि विशेषत: चंद्रपूर जिल्हा हा पाषाणयुगात, हिमयुगात जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश होता हे अनेक ठिकाणी आढळलेल्या अवजारावरुन लक्षात येते. अश्मयुगात मानव नदीकिनारी राहत असे. भोयेगाव परिसरात नदीकिनारी आढळणारे खडक हे 150 कोटी वर्षाच्या असून, ते रुपांतरित प्रकारात मोडतात. हे खडक या परिसरात हिमयुगात वाहून आलेले गाळ मिश्रित असून, त्यात लहान गोल खडक आढळतात. हे खडक 40000 ते 25000 वर्षादरम्यान वाहात आलेले आहेत. यात क्वार्टझाईट, अगेट, क्वार्ट्झ, जास्पर हे खडक अतिशय टणक आणि मजबूत असून, अश्म अवजारांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. म्हणूनच अश्मयुगातील लोकांना क्वार्टझाईट मॅन असे म्हटले गेले. भोयेगाव जवळील अवजारात पूर्व पाषाण युगात वापरात असलेली खूप मोठ्या आकाराची अवजारे नाहीत, तर लहान आकाराची हात कुर्हाड आणि ब्लेड्स जास्त प्रमाणात आढळतात.
प्राचीन मानव हा भटकंती करीत असला तरी तो हा बारमाही नदी किंवा नाल्याच्या जवळ काही काळ राहत असे. या परिसरात गुहा नसल्याने ते झाडाच्या आसर्याने उघड्यावर जीवन जगत होते. अवजारे बनवणे आणि अन्नाच्या शोधात भटकणे असा त्यांचा दिनक्रम असे. ज्या ठिकाणी अवजारे बनवण्यासाठी योग्य खडक असेल आणि अन्न उपलब्ध असेल तेथे काही वर्षे राहणे आणि पुढे योग्य ठिकाणी जाणे असे त्यांचे जीवन होते. आज जिल्ह्यात जो आदिवासी आणि बहुजन समाज आहे ते अश्मयुगीन मानावांचेच वंशज आहेत. आदिमानवामध्ये सुधा वांशिक विभिन्नता होती, हे त्यांच्या आजच्या चेहरेपटीवरून लक्षात येते. पुढे वांशिक सरमिसळ झाली आणि मानव विविध जातीत विभागलेला आजचा बहुजन समाज निर्माण झाला. पुढे नवाश्म युगात आपण शेती करायला शिकलो आणि गावे करुन स्थायिक झालो, असाही दावा चोपणे यांनी केला.