नाल्यात कोसळून ट्रॅव्हल्सचा झाला अपघात.
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोर्टर
मो 9096817953
भिवापूर :- भिवापूरहून नागपूरकडे जात असताना कारगाव (मानोरा फाटा) परिसरात ट्रॅव्हल्स नाल्यात कोसळून अपघात झाल्याची दुर्दैवी घटना आज २४ एप्रिल गुरुवारला सकाळच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नसली तरीही सुमारे २२ ते २३ प्रवासी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच भिवापूर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला आणि जखमींना बाहेर काढण्याच्या कामाला गती मिळाली तसेच या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माजी आमदार तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे आणि माजी आमदार सुधीर पारवे हे तात्काळ घटनास्थळी हजर होऊन,जखमी प्रवाशांना उपचारासाठी उमरेड ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात भेट देऊन, सर्व जखमी प्रवाशांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यापैकी दोन गंभीर जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.