श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात दीक्षांत व गुणगौरव समारंभ संपन्न

श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात दीक्षांत व गुणगौरव समारंभ संपन्न

✍️सचिन सतीश मापुस्कर ✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी : – श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ व प्राध्यापकांचा गुणगौरव, महर्षी कर्वे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. डी. पी. राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बी.ए. ९, बी.कॉम. ४२, बी. एस. सी. १७ आणि एम. कॉम. च्या १४ स्नातक विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. “जागतिकीकरणाच्या या स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण तयार करून विद्यार्थी सर्व गुणसंपन्न झाला पाहिजे, नोकरी करण्यापेक्षा कौशल्य अवगत करून स्वतःचा व्यवसाय उभा केला पाहिजे, त्यासाठी शासनाच्या अनेक कौशल्य विकासाधिष्ठित व अर्थसाह्य योजनांचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा” असे आवाहन प्राचार्य, डॉ. राणे यांनी केले. कार्यक्रमाचा हेतू, उद्देश आणि भूमिका, परीक्षा विभाग प्रमुख, प्रा. राजू गोरुले यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केला. महाविद्यालय विकास समिती सदस्य, श्री. नितीन सुर्वे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशींच्या कल्पनेतून गेल्या पाच वर्षात अनेक प्राध्यापकांनी विविध विद्यापीठांसाठी विविध विषयांचे संदर्भ पुस्तके लिहिली आहेत, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मासिकांमधून व परिषदांमधून संशोधन पेपर्स व विद्यापीठ आणि यु जी सी स्तरावर लघुशोध निबंध प्रकाशित केले आहेत. अशा प्राध्यापकांना स्मृतीचिन्ह व गुलाब पुष्प देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यात प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी, डॉ. विवेक खरे, उपप्राचार्य, प्रा. किशोर लहारे, डॉ. कल्याणी नाझरे, डॉ. निलेश चव्हाण, प्रा. दिपाली पाठाराबे, डॉ. विशाल माने, श्री. भाऊसाहेब पाटील, श्री. नवज्योत जावळेकर, प्रा. श्री.राजू गोरुले व प्रा. सागर कुंभार यांना सन्मानित करण्यात आले. वैश्विकरणाच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय किंवा धंदा सुरू करा, व्यवसायावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न करा, महत्त्वाकांशी राहा आणि जीवनात यशस्वी व्हा. अशी भावना अध्यक्षीय समारोपात, प्राचार्य, डॉ. श्रीनिवास जोशी यांनी व्यक्त केली. संस्थेच्या सचिव, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर. पी देशपांडे, कार्याध्यक्ष, प्राचार्या, डॉ. सुहासिनी संत यांनी सर्वच स्नातक ना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. कार्यक्रम यशस्वीतीसाठी डॉ. निलेश चव्हाण प्रा. राजू गोरुले, प्रा सागर कुंभार, उप प्राचार्य, किशोर लहारे व सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी प्रयत्नशील होते, आभार प्रदर्शन, प्रा. सागर कुंभार यांनी केले.