नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 27 हजाराचा दंड वसूल; अन्टीजन तपासणीमध्ये 4 पॉझेटिव्ह मिळाले.

47

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
भद्रावती :- शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सयुक्तपणे कारवाई करीत असताना विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या तसेच संचारबंदी मध्ये नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कडून सव्वीस हजाराचा दंड वसूल करण्यात आला असून त्यांची अॅन्टीजन तपासणी मध्ये चार रुग्ण पॉझेटिव्हआढळले आहे.

महेश शितोळे तहसीलदार , सुनील सिंग पवार ठाणेदार यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहे त्यात शहरातील सोशल डिस्टन अटींचे पालन न करणाऱ्या दहा दुकानदारावर, मोटार वाहन कारवाईत 19 जणांवर, मास्क न घालणाऱ्या सहा जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सव्वीस हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच शहरात विनाकारण फिरणाऱ्या 92 नागरिकांची अॅन्टीजन टेस्ट करण्यात आली त्यात दोन पुरुष आणि दोन महिला पॉझिटिव्ह आढळल्या त्यांना जैन मंदिर येथील कोव्हिड सेंटरमध्ये पाठविण्यात आले.

शासनाच्या आदेशाने भद्रावतीत वाढते रुग्ण बघता या कारवाया करण्यात येत असल्याने. कामावर जाणाऱ्या तसेच कर्तव्यावर असनाऱ्यांची जानून अॅन्टीजन करण्यात येत असल्याचे उलट-सुलट मेसेज सोशल मीडियावर पसरवून पोलिसांची बदनामी करुन शासकीय कामात अडथडा निर्मान केला जात आहे. मात्र ही कारवाई संयुक्तरित्या तहसील, नगरपरिषद, पोलीस विभाग यांच्या माध्यमातून करण्यात येत असून या नियमाचे नागरीकांनी पालन करावे असे ठाणेदार सुनील सिंग पवार यांनी सांगितले.