बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा.
बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा.

बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना केले चहा, नाश्ता व बिस्किटाचे वाटप.

बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा.
बेलसरे कुटूंबियांनी सामाजिक बांधिलकी जोपासत केला मुलाचा वाढदिवस साजरा.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
गडचिरोली : – शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी आपला मुलगा अर्जुन याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाततील कोरोनाबधित व इतर रुग्णांच्या नातेवाईकांना 24 मे रोजी सकाळी नाश्ता, चहा व बिस्किटाचे वाटप केले.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यच्या दुर्गम भागातून रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात.या कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 15 मे पासून शिवसेनेच्या वतीने चहा,नाश्ता व बिस्किटाचे वाटप करण्यात येत आहे. बेलसरे कुटूंबियांनी सामाजीक बांधिलकी जोपासत याच सेवाकार्याला मदत म्हणून आपला मुलगा अर्जुन याच्या वाढदिवशी नाश्ता, चहा व बिस्किटांचे वाटप करून माणुसकी जोपासली व एक चांगला संदेश दिला.

या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू कावळे, उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, उदय धकाते मंगेश पोरटे, आष्टीचे ग्रामपंचायत सदस्य संतोष बारापात्रे,शिव श्रुंगारपवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here