नारंडा येथे १ कोटी निधी अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर

46

नारंडा येथे १ कोटी निधी अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर

कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचा पुढाकार.

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीला यश.

नारंडा येथे १ कोटी निधी अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर
नारंडा येथे १ कोटी निधी अंतर्गत पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर: – कोरपना तालुक्यातील नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर झाली असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे मागणी केली होती सदर मागणीची दखल घेत पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीकरिता तब्बल १ कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली होती,त्यामुळे त्या रुग्णालयात डॉक्टरांना काम करणे अवघड जात होते, तसेच पशुपालकांनासुद्धा रुग्णालयात अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता, तसेच रुग्णालयाची इमारत ही अतिशय जुनी असल्यामुळे रुग्णालयात आधुनिक सोयी सुविधांचा अभाव होता यासर्व बाबींची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांच्याकडे मागणी करून पाठपुरावा सुरू केला त्यांचा मागणीची दखल घेत त्यांनी नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारती करीता ९८ लक्ष ८९ हजार रुपये निधी मंजूर केला.

नारंडा, लोणी, पिपरी, शेरज बु, शेरज खुर्द, वनसडी, सोनूर्ली गावांचा सदर रुग्णालया अंतर्गत समावेश होतो रुग्णालयाची इमारत मंजूर झाल्यामुळे येथील पशुपालकांना याचा लाभ होणार आहे. नारंडा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत मंजूर झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे आभार व्यक्त केले आहे.