ब्रम्हपुरी तालुक्याला कमिशनखोरी चे ग्रहण; कमिशनखोर नेत्याला गब्बर बनवणाऱ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा.

ब्रम्हपुरी तालुक्याला कमिशनखोरी चे ग्रहण; कमिशनखोर नेत्याला गब्बर बनवणाऱ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा.

ब्रम्हपुरी तालुक्याला कमिशनखोरी चे ग्रहण; कमिशनखोर नेत्याला गब्बर बनवणाऱ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा.

ब्रम्हपुरी तालुक्याला कमिशनखोरी चे ग्रहण; कमिशनखोर नेत्याला गब्बर बनवणाऱ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा.

✒  अमोल माकोडे ✒
ब्रम्हपुरी तालुका प्रतीनिधी
ब्रम्हपुरी :- एकेकाळी वांदेच वांदे असलेले व्यक्ती अल्पावधितच कमिशनखोरी ने जेव्हा करोडपती होऊन तोऱ्यात मिरवरतो तेव्हा तो त्या परिसरात नक्कीच चर्चेचा विषय बनतो आणी तो व्यक्ती जर राजकीय पटलावार लोकनियुक्त लोकप्रतिनिधी असेल तर त्याची चर्चा वाऱ्यासारखी सर्वदूर पसरते आणी साहजिकच अश्या पांढरपेशी कमिशन खोर नेत्या ला गब्बर बनवणाऱ्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा व्हायला लागते.

सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवावे या हेतूने राज्य शासन व केंद्र शासन विविध माध्यमातून कोट्यावधीचा निधी देतो मात्र या निधित मोठी कमिशनखोरी करून निकृष्ट कामे करणाऱ्यास प्रोत्साहन देऊन फक्त कमिशन वर डोळा ठेऊन कामे केल्या जात असतात. अवैध धंद्यातून मिळणाऱ्या भरमसाठ मिळकतीने सर्वत्र छी-थू होत असतांना त्याकडे काना-डोळा करत कमिशनखोरीत तरबेज कमिशनखोर अवैध कारभाराचा मासिक कमिशन मोठ्या नेत्याच्या नावाने जमा करण्याची जणू परंपरा असल्यागत अविर्भावात राहतात तर त्यातून स्व:विकास साधून वेळ प्रसंगी तो मोठा नेता आपणच असल्यागत तोर्यात वावरतात. कमिशन खोरीच्या राजकारणाने सुसंस्कृत अशा शहराला वेठीस धरले आहे. कमिशन खोरांचा बंदोबस्त करण्यात यावा व चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक श्री सागर आमले यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना केल्याने त्यांची सर्वत्र निष्कलंक, प्रामाणिक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून प्रशंसा होत आहे मात्र शहरातील इतर नेते शांत असल्याने शंका-कुशंकेला पेव फुटत आहे.

शहरातील सर्वसामान्यांनी घराचे स्वप्न पाहिले आणी श्रमाच्या घामाने पै पै जमा केलेली पदराची गाठ सोडून गोळा केलेला पैसा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील नावारूपास आलेल्या व्यक्तींच्या मार्फत गुंतवला मात्र त्यांच्या स्वप्नाला पायाखाली तुडवत काही लबाड नामवंत बहुरूपीयांनी आपल्या तल्लख बुद्धीच्या व राजकीय वरदहस्ता खाली काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर “गुंठेवारी” प्रकरण घडवून आणत गुंतवणूकदार शहरवासियांना अक्षरशः बरबाद केले. ते प्रकरण अजूनही न्याय प्रविष्ट आहे.

मात्र तोंडाला लागलेली कमिशनखोरीची आदत जात नाही त्यामुळे यांनी राजकारण हा आपला व्यवसाय बनवून शहरातील आरक्षित भूखंड असो की गौण खनिज असो यावर डोळा ठेऊन असतात आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली यंत्रणा यांना सलाम ठोकतांना दिसत आहेत, अल्पावधित श्रीमंत होण्याची हौस असलेल्यांसाठी हे कमिशनखोरच माय-बाप झाले असून अवैध धंद्याने युवावर्ग वाममार्गा कडे वळत आहे त्यामुळे “कुंपणच शेत खातो” अशी अवस्था झाल्याने न्याय मागू मी कुना या नैराश्यच्या सुरात तालुक्यातील सर्वसामान्य जनता हताश असून न्यायिक अपेक्षेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here