मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील संस्थेत कोटय़वधीचा भष्ट्राचार; एक अटक, एक फरार.

48

मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील संस्थेत कोटय़वधीचा भष्ट्राचार; एक अटक, एक फरार.

मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील संस्थेत कोटय़वधीचा भष्ट्राचार; एक अटक, एक फरार.
मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील संस्थेत कोटय़वधीचा भष्ट्राचार; एक अटक, एक फरार.

✒️नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी✒️
मुंबई:- देश आणि राज्य भष्ट्राचार आणि घोटाळामुळे पार पोकरुन गेले आहे. रोज कुठेना कुठे भष्ट्राचार, लाच, घोटाळा समोर येत असतो. अशीच एक घोटाळा समोर आला आहे. मुंबईच्या उपनगर परळच्या केईएम रुग्णालय व मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या स्वायत्त संस्थेत कोटय़वधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घोटाळा करणा-या एका कर्मचा-याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली, तर एक फरार आहे. हे दोघे संस्थेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कामाला होते. त्यांनी माजी अधिष्ठातांच्या बनावट स्वाक्षऱया करून ही रक्कम लांबवली होती.

मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील केईएम रुग्णालयाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने 1991 रोजी तत्कालीन प्राध्यापक-शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत ‘डायमंड ज्युबिली सोसायटी ट्रस्ट’ या नावाची स्वायत्त संस्था स्थापना केली. या संस्थेद्वारे प्रामुख्याने वैद्यकीय संशोधन व अनुषंगिक सहकार्य करण्याचे कार्य केले जाते. या स्वायत्त संस्थेच्या निधीमध्ये संस्थेचे कंत्राटी कर्मचारी असणाऱयांनी अपहार केल्याचे लक्षात येताच लेखपाल श्रीपाद देसाई व लिपिक राजन राऊळ यांच्याविरोधात भोईवाडा रुग्णालयात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही कर्मचाऱयांना ट्रस्टच्या कामातून आधीच काढून टाकण्यात आले आहे. यापैकी राजन राऊळ याला भोईवाडा पोलिसांनी अटक केली, तर दुसरा आरोपी श्रीपाद देसाई फरार आहे.