पत्रकारना शासनाचे सुरक्षा कवच, पण जे नावापुरते आहे त्याच काय?

53

पत्रकारना शासनाचे सुरक्षा कवच, पण जे नावापुरते आहे त्याच काय?

पत्रकारना शासनाचे सुरक्षा कवच, पण जे नावापुरते आहे त्याच काय?
पत्रकारना शासनाचे सुरक्षा कवच, पण जे नावापुरते आहे त्याच काय?

✒मुकेश चौधरी, विदर्भ ब्युरो चीफ✒
हिंगणघाट,दि.24:- शासनाने आता पत्रकारांना सुरक्षा कवच दिल आहे. आता पत्रकाराला हाथ लावने तर दूर साधी धमकी सुद्धा देता येणार नाही. पण काही पत्रकार हे केवळ नावापुरते असून पत्रकारीतेच्या आड आपले काळे धंदे चालवीत आहे त्यांचा विचार करण्याची आज शासनाला नित्यात गरजेचे झाले आहे.

आज मोठ्या प्रमाणात शहरात कुत्र्याच्या कळपा सारखे पत्रकार उगवलेले आहे. आज साधा पेपर वाटणारा स्वताःला पत्रकार म्हणून जनतेत मिळवत आहे. आज हिंगणघाट शहरात वार्ताहर कमी आणि पत्रकार जास्त असे दिसून येत आहे. आज पत्रकार असल्याचे सांगून लोकांना, अवैध धंदे, व्यवसायीकाना ब्लैकमेलच्या माध्यमातुन मोठी आर्थिक उडाढाल करत असल्याचे आम जनते म्हणून समोर येत आहे.

आता तर हे ब्लैकमेरल पत्रकार मोठ्या प्रमाणात अवैध धंदेवाल्यांच्या बरोबरी सध्यात भागीदार पण होत आहे. तर काही पत्रकाराचे हिंगणघाट शहर व परिसरात दोन नंबरचे धंदे आहे. कुणी ठेकेदारी करतात तर कुणी दलाली करतात. आणि पत्रकारीतेच्या आडून आपले उखळ पांढरे करतात. यांना आपण वृत्तपत्राचे वार्ताहर आहो हे ही समजत नाही. ते मी अमक्या धमक्या पेपरचा पत्रकार अाहो असे बोबलत फिरतात.

ज्याना पत्रकार व वार्ताहर मधला फरक कळत नाही तो लिहिण्यात किती उजेड पाडणार हे सहज लक्षात येते. पत्रकारितेच्या आडून ठेकेदारी करणारे गब्बर झाले. कारण ते स्वतः पत्रकार म्हणजे वार्ताहर असल्याने त्यांच्या विरोधात कोण तक्रार करील. आणि कामावर देखरेख ठेवणारे अधिकारीही ठेकेदारच वार्ताहर असल्याने काहीही करू शकले नाही. त्यामुळे या (पत्रकार) ठेकेदारांनी थायुर मातुर कामे करून गब्बर झाले आहे.

धंदे करणारे पत्रकाराचे तर काही विचारू नका. स्वतः काळे धंदे करायचे आणि दुसर्याना तूझी बातमी छापतो असे धमकावयाचे असा प्रकार सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक करनारे आहेत. काही अवैध धंदे करणारेही आहे. कोरोना संकटात सध्या सर्व व्यावसाय ठप्प असले तरी अवैध पणे रेती उपसा करून त्याची वाहतूक निर्विघ्न पणे सुरू आहे. पत्रकारितेच्या आड दलाली करणारेही आता मागे राहिलेले नाही. कोणतेही प्रकरण घडले की हे पत्रकार दलाल तिथे पोहचून सेटिंग करण्याची तयारी दाखवितात.

या प्रिंट मीडिया सोबत आता यूट्यूब मिडिया चॅनल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया वाले पत्रकार आपल्या न्युज चॅनल चा गाजावाजा करताना दिसतात. सबसे पहिले, सबसे आगे अश्या वल्गना करून हे चॅनल वाले ही आपले उखळ पांढरे करीत आहे. या पत्रकारीच्या आडून आपले धंदे, ठेकेदारी, दलाली करणाऱ्याची संख्या वाढल्याने फक्त पत्रकारिता करणाऱ्या ना देखील आता पूर्वी सारखा मान राहिला नाही. पत्रकाराला जाहिरातीचे टार्गेट द्यावे लागते. पण कुत्र्याच्या कळपा सारखे उगवलेल्या या धंदेवाईक पत्रकारामुळे जाहिरात देणारे कुणाला देऊ आणि कुणाला नको, या चक्रात अडकले आहे, यात फक्त खरी पत्रकारिता करणाऱ्यांची कोंडी होत आहे.