राष्ट्रवादीनगरात बुध्द पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजीत

राष्ट्रवादीनगरात बुध्द पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजीत

राष्ट्रवादीनगरात बुध्द पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजीत

राष्ट्रवादीनगरात बुध्द पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आयोजीत

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

राष्ट्रवादीनगर : 23 मे
तुलशीनगर येथील बौध्द धम्म उपासक – उपासिका यांच्या उपस्थितीत ” बौद्ध समाज मंडळ ” च्या वतीने स्थानिक ” धम्मकीर्ती बुध्द विहार ” येथे बुध्द पौर्णिमा कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
बौध्द समाजाच्या अधिनस्त जागेवरील पंचशील ध्वज , डॉ. आंबेडकर चौक येथिल पंचशील ध्वज तसेच धम्मकीर्ती बुध्द विहार येथिल पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण , बौद्ध समाज मंडळ चे अध्यक्ष आयु. राकेश रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयु. निरंजने सर, अनिल देवगडे सर, विवेक कांबळे, अमित ढोले, जितू वाकडे, अक्षय कांबळे, दीलखुष भडके यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी प्राध्या. भारत मेश्राम यांनी समायोचीत मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. उद्धव ठेमस्कर यांनी केले तर देवगडे सर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास बहुसंख्य उपासक – उपासिका उपस्थित होते. शेवटी सर्वांना ” खीरदान ” वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.