एसटीच्या धडकेत कंपाऊंड भित कोसळली;पाच महीला पैकी एक गंभीर जखमी.

एसटीच्या धडकेत कंपाऊंड भित कोसळली;पाच महीला पैकी एक गंभीर जखमी.

एसटीच्या धडकेत कंपाऊंड भित कोसळली;पाच महीला पैकी एक गंभीर जखमी.

एसटीच्या धडकेत कंपाऊंड भित कोसळली;पाच महीला पैकी एक गंभीर जखमी.

किशोर पितळे तळा तालुका प्रतिनीधी९०२८५५८५२९

तळा :- तळा बस स्थानकात एसटी रिव्हर्स घेताना एसटीची भिंतीला धडक बसली या धडकेत भिंत कोसळली.ही भिंत मच्छि विकणाऱ्या महील्यांच्या अंगावर कोसळली या घटनेत महिलांना दुखापत झाली असून ही घटना घडताच नागरिकांनी गर्दी केली ताबडतोब त्यांना तेथून बाहेर काढले आणि उपचारासाठी तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले एकूण पाच महिला जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असून अधिक तपासणीसाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.               तळा एसटी स्थानक संरक्षक भिंतीच्या डाव्या बाजूला भव्य मच्छी मार्केट आहे परंतु मच्छी विक्रेते एसटी स्थानक संरक्षक भिंतीला लागूनच दररोज मच्छी विकण्यास बसलेले असतात.एसटी स्थानकात नेहमीप्रमाणे एसटी आली आणि रिव्हर्स घेताना एस टी ची भिंतीला धडक बसली या धडकेत भिंत कोसळली आणि मच्छी विकणाऱ्या लखमु माया सुतार, अनुसया लक्ष्मण सुतार, यमुना भामजी देवे, हिरा रामचंद्र फकीरे, लीला विजय खुटिकर यांच्यावर मोठमोठाले दगड अंगावर कोसळले म्हणून दुखापत झाली.नशिबाने काळ आला होता पण वेळ आली नाही अशीच परिस्थीती होती. हे सगळ अचानक घडल की, काही कळण्याच्या आतच या महिलांवर भिंत कोसळली कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या घटनेला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.या पुर्वी देखील अशीच घटना घडली होती

दरम्यान घटना स्थळी पोलिसांनी भेट दिली असून पुढील त्यांनी कार्यवाही करण्यास सुरुवात केली असल्याचे समजते.या घटनेमुळे दयनीय अवस्थेत असलेले तळा एसटी स्टँड पुन्हा चर्चेत आले असून गैरसोयींचे माहेरघर बनलेल्या तळा बसस्थानकातील समस्या सुटणार तरी कधी? असा प्रश्न आता तळावासीयांना पडला आहे.बस स्थानका समोरील डाव्या बाजूला असलेला भाग ऊंच व खडकाळ असल्यामुळे चालकाला स्थानकात एसटी लावण्यास अडचण निर्माण होते, तसेच त्याठिकाणी एसटी फिरवून घेणे मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे अशा घटना घडत आहेत.एसटी महामंडळाच्या संबंधित विभागीय नियंत्रकअधिकाऱ्यांनी रोहा आगार व्यवस्थापक यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बसस्थानकात असलेल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावाव्या अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे मच्छी विक्रेत्यांनी मच्छी मार्केटचा वापर दैनंदिन मच्छी विक्री करता करावा बाहेर रस्त्यावर मच्छी विकण्यास बसू नये या संदर्भात नगरपंचायतीने योग्य ती दखल घेऊन कार्यवाहीकरावी अशी मागणी होत आहे.या पुर्वी देखील अशीच घटना घडलीअसताना मच्छी विक्रेत्या महीला,आदिवासी महीला या ठिकाणी बसत असतात.मागील घटना घडल्या नंतर अनेक वेळा नगरपंचायत प्रशासननाने विक्रेत्यांना मच्छी मार्केटचा वापर करावा वारंवार पत्र दिलेआहेत तसेचवृतपत्राच्या माध्यमातूनदेखीलबातमी प्रसिध्द झाल्या असताना मच्छी विक्रेत्या कंपाउड लगत व रस्त्यावर विक्री करतात व वाहतूक कोंडीला अडथळा देखील होत असतो.यावर तात्पुर्ती कारवाई होते.पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थीती होते.हि घटना घडल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आता तरी दिर्घ काळ उपाय योजना करावी अशी मागणी केली जात आहे.