बारावी परीक्षेत एकता जूमडेचे सुयश
• विविध स्तरातून सत्कार व अभिनंदन
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 24 मे
नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी परीक्षेच्या निकालात एकता दिनेश जुमडे हिने घवघवीत यश प्राप्त केले असून, तिला ८१.६७ टक्के गुण मिळाले. नियमित अभ्यास केल्यास यश संपादन करता येते, अशी प्रतिक्रीया एकताने दिली असून, पुढे उच्च शिक्षण घेणार असल्याचे तिने सांगितले. महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं गृपच्या वतीनेही महिला पदाधिकारी व सदस्यगणांनी एकताचे अभिनंदन केले. सर्वच स्तरातून तीचे अभिनंदन करण्यात येत आहे. एकताने यशाचे श्रेय आईवडील आणि गुरूजनांना दिले आहे.