म्हसळ्यात रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव
✍️संतोष उद्धरकार.✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा: म्हसळा शहरात गेली कित्येक दिवस रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरु आहे, आदीच उकाडयाने हैराण झालेले नागरिक रात्रीच्या वेळी अचानक लाईट जात असल्याने अधिक त्रस्त झाल्याचे समजते, गेली कित्येक दिवस रोज रात्री चार ते पाच वेळा विज पुरवठा खंडित होत असुन मध्येच विज पुरवठा सुरु होऊन विदयुत भार कमी जास्त होत आहे, गौवळवाडी, साळीवाडा, कन्या शाळा, सोनारआळी, साने आळी,नवेनगर, आदि परिसरात हा प्रकार घडत असल्याने यामुळे घरातील विजेवर चालणारी सर्व उपकरणे नादुरुस्त होऊन वित्तहानी होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण म्हसळा विभागाकडून लवकरात लवकर यावर उपाययोजना करण्यात यावेत अशी म्हसळेकरांची मागणी आहे.