चांदोरे बौद्धवाडी येथे भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव संपन्न.
✍️नंदकुमार चांदोरकर✍️
माणगाव तालुका प्रतिनिधी
📞८९८३२४८०४८ 📞
माणगाव : माणगांव तालुक्यातील चांदोरे येथे २३ मे २०२४ रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८७ वी तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी संयुक्त जयंती उत्सव आदर्श चांदोरे बौद्ध विकास मंडळ, माता रमाई महिला मंडळ, नव तरुण मंडळ स्थानिक व मुंबई मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली.
अगदी सकाळी ८ वाजल्या पासुनच कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, स.९ वाजता चांदोरे बुद्ध विहारात भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून पंचशीला घेवून मानवंदना घेण्यात आली,.
जयंती कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी बामसेफ महाराष्ट्र राज्य युवक उपाध्यक्ष धम्म प्रचारक कासारे सर यांनी आपल्या प्रवचनातून बौद्ध धम्माची इतंबुत माहिती दिली.
२३ मे रोजी सकाळी १०:३० वा. ग्रामपंचायत मधे जाऊन महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. सकाळी ११:३० वा भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त मिरवणुक काडण्यात आली.
स्नेह भोजन दुपारी १:००वा., प्रवचन दुपारी ३ ते ५.३०, विद्यार्थी गुणगौरव सोहळा संध्याकाळी ६ ते ७वा. संध्याकाळी ७ ते ८ वा. सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत वाडीतील लहान थोरांनी भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ्.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आपले महान विचार व्यक्त केले, रात्री ८ ते ९ जयंतीस उपस्थित सर्व मान्यवर अतिथी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच रात्री ९:३० वा. स्नेह भोजन असा कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती रामदासजी मोरे त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती वणमाला मोरे ताई, चांदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई साक्षी शिंदे तसेच त्यांच्या समवेत सदस्य सायली चाचले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सुधा लोखंडे मॅडम ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांतजी चांदोरकर तसेच पंचक्रोशीतील काही नागरिक उपस्थित होते,
तसेच कार्यक्रमाचे आयोजक चांदोरे बौद्धवाडीतील स्थानिक मंडळ, व मुंबई मंडळ.विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची धुरा मंडळाच्या सचिव बाळाराम तांबे यांनी अगदी शेवट पर्यंत सांभाळली.स्थानिक मंडळ ,महिला मंडळ, व नवतरुण मंडळ यांनी खुप मेहनत घेवुन कार्यक्रम अगदी उत्साहात पार पाडला.