जळगाव जिल्हात चोरट्याने घातला एटीएम मध्ये दरोडा, 17 लाखासह एटीएम मशीन नेली चोरुन.

52

जळगाव जिल्हात चोरट्याने घातला एटीएम मध्ये दरोडा, 17 लाखासह एटीएम मशीन नेली चोरुन.

जळगाव जिल्हात चोरट्याने घातला एटीएम मध्ये दरोडा, 17 लाखासह एटीएम मशीन नेली चोरुन.
जळगाव जिल्हात चोरट्याने घातला एटीएम मध्ये दरोडा, 17 लाखासह एटीएम मशीन नेली चोरुन.

 

         मिडिया वार्ता न्यूज

    जळगाव जिल्हा प्रतिनिधी

          विशाल सुरवाडे

जळगाव,दि.24 जून:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चाळीसगाव येथील खरजई नाका परिसरात असलेल्या स्वयंमवर मंगल कार्यालय परीसरातील स्टेट बॅक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन मधे असलेले 17 लाखांची रोखसह एटीएम मशीन रात्री 1:30 वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने सर्वीकडे एकच खळबळ उडाली आहे. चाळीसगावात प्रथमच चक्क इतकी मोठी रक्कम असलेले एटीएम मशीनच चोरीला गेल्याने चोरट्यांनी पोलिसांनाच मोठे अहवान दिले आहे.

 

चाळीसगाव शहरातील खरजई रस्त्यावर स्वयंमवर मंगल कार्यालय परिसरातील खाजगी जागेत भाडेतत्वावर असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशिनच गस्तीवर असलेल्या पोलीसांना मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलीसांनी बँकेच्या अधिकार्‍यांना माहिती दिली.

 

एसबीआय शाखेच्या एटीएम मशीन मध्ये बँकेकडील पैशांचा भरणा करण्याचे काम एका खाजगी कंपनीला दिलेले आहे. या कंपनीत काम करणारे सुशिल गणेश पाटील आणि मयुर बाळु सोनवणे अशा दोघांनी 22 जुन रोजी दुपारी 4 वाजता 20 लाख रुपयांचा भरणा एटीएम मशीनमध्ये केला होता. त्यापैकी 17 लाख 53 हजार 500 रुपये एटीएममध्ये शिल्लक होते. चोरट्यांनी पाळत ठेवून मध्यरात्री रोकडसह एक लाख रुपये किंमतीचे ए. टी. एम. मशीन असा एकूण 18 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चारचाकी वाहनाव्दारे लपास केला आहे. एटीएमध्ये असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे मशीन उंचलतांना दिसून येत आहे. याप्रकरणी कंपनीचे दिपक दौलत तिवारी रा. जळगांव यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात भादवी कलम 380 प्रमाणे गुन्हां दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एपीआ चाळीसगाव पोलीस करीत आहेत.