*जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक*
*निवडणुक व सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961
अकोला,दि.23(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयीन निर्णयानुसार जिल्हा परीषद व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. त्यानुसार अकोला जिल्हा परिषदमधील 14 निवडणुक विभागाकरिता व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीमधील 28 निर्वाचक गणांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणूकीकरीता तालुकानिहाय निवडणुक निर्णय अधिकारी तसेच सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या खालील प्रमाणे करण्यात आले आहे.
अ.क्र
तालुक्याचे नांव
निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम
सहायक निवडणुक निर्णय अधिकारी यांचे पदनाम
नेमून दिलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गण
1
तेल्हारा
उपजिल्हाधिकारी, रोहयो विभाग,
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
तहसिलदार तेल्हारा
निवडणूक विभाग ०१-दानापूर, ०३-अडगाव बु., ०४ तळेगांव बु.
निर्वाचक गण -०३-हिवरखेड, ०६-अडगाव बु.,१३-वाडी अदमपूर,१५-भांबेरी
2
अकोट
उपविभागीय अधिकारी अकोट
तहसिलदार अकोट
निवडणूक विभाग १० अकोलखेड, १५-कुटासा
निर्वाचक गण १८- पिंप्री खु.,
१९-अकोलखेड, २५- मुंडगाव, २८-रौदळा
3
मुर्तिजापुर
उपविभागीय अधिकारी मुर्तिजापुर
तहसिलदार मुर्तिजापुर
निवडणूक विभाग -१७-लाखपूरी,
१८-बपोरी,
निर्वाचक गण ३४-लाखपूरी, ३५-ब्रम्ही खु. ३९-माना, ४६-कानडी
4
अकोला
उपविभागीय अधिकारी अकोला
तहसिलदार अकोला
निवडणूक विभाग २६-घुसर,
२९-कुरणखेड, ३०-कानशिवणी निर्वाचक गण ४९-दहिहांडा, ५२-घुसर, ५७-पळसो, ५८-कुरणखेड,
६६-चिखलगांव
5
बाळापुर
उपविभागीय अधिकारी बाळापुर
तहसिलदार बाळापुर
निवडणूक विभाग ३४-अंदुरा, ३९-देगाव निर्वाचक गण ७२-निमकर्दा,७५-पारस भाग-१, ७८-देगाव,८०-वाडेगाव भाग क्र.२
6
बार्शिटाकळी
उपजिल्हाधिकारी, भुसंपादन(केपीएमपी)
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
तहसिलदार बार्शिटाकळी
निवडणूक विभाग ४२-दगडपारवा, निर्वाचक गण ८३-दगडपारवा,
८६-मो-हळ, ८९- महान, ९१-पुनोती
7
पातुर
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग
जिल्हाधिकारी कार्यालय अकोला
तहसिलदार पातुर
निवडणूक विभाग ४८-शिर्ला निर्वाचक गण ९६-शिर्ला, ९७-खानापुर, १०५-आलेगाव
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार निवडणूकीच्या तारखांची सुचना व निवडणूकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मंगळवार दि. 29 जून 2021 रोजी प्रसिध्द करतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद/पंचायत समिती/ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.