खेलरत्न पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ

48

खेलरत्न पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ

खेलरत्न पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ
खेलरत्न पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास 28 जूनपर्यंत मुदतवाढ

                  मिडिया वार्ता न्यूज 
              जळगाव जिल्हा प्रतिनिधी
                    विशाल सुरवाडे

जळगाव- दि. 24 – केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय खेळातील अतिउच्च कामगिरीबाबत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व या खेळांचा प्रचार, प्रसार व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच ध्यानचंद पुरस्कार व विद्यापीठासाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
या पुरस्कारांकरिता सन 2021 साठी नामनिर्देशाचे प्रस्ताव दि. 21 जून, 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करावयाचे होते. परंतु सदर प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून दिनांक 28 जून, 2021 पर्यंत अर्जदार आपले प्रस्ताव केंद्र शासनास surendra.yaday@nic.in किंवा girnish.kumar@nic.in या मेलवर सादर करु शकतील. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.