सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा*

55

*सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा*

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा*
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांचा नांदेड जिल्हा दौरा*

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज
8208166961

नांदेड (जिमाका) दि. 23 :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल.

शनिवार 26 जून रोजी दुपारी 3.30 वा. अहमदपुर जि. लातूर येथून मोटारीने लोहा येथे आगमन व जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष यांच्या समवेत लोहा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 4.15 वा. लोहा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण. सायं. 4.45 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सायं. 5 वा. जिल्हास्तरीय समाज कल्याण विभागाची आढावा बैठक स्थळ- शासकीय विश्रामगृह नांदेड. सायं. 7 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम.

रविवार 27 जून रोजी सकाळी 9.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून हरीहरराव भोसीकर जिल्हाध्यक्ष यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव. सकाळी 10.15 वा. नांदेड शहर जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. सकाळी 10.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नांदेड दक्षिण / उत्तर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11.45 वा. नांदेड ग्रामीण जिल्हा कार्यकारणी बैठकीस उपस्थिती. दुपारी 12.30 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत नायगाव देगलूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 ते 2.45 वाजेपर्यंत नांदेड येथे राखीव. दुपारी 2.45 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमवेत मुखेड व भोकर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4.15 वा. नांदेड येथून मोटारीने हदगावकडे प्रयाण. सायं. 5.45 वा. हदगाव येथे आगमन व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत हदगाव विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सायं. 6.30 वा. हदगाव येथून मोटारीने माहूरकडे प्रयाण. रात्री 8 वा. शासकीय विश्रामगृह माहूर येथे आगमन मुक्काम.

सोमवार 28 जून रोजी सकाळी 9 वा. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समवेत किनवट विधानसभा मतदारसंघ आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 10 वा. माहूरगड येथून मोटारीने उमरखेड जि. यवतमाळकडे प्रयाण करतील.