रुग्णालयात 24 वर्षिय रुग्णाचे उंदरांने कुरतडल शरीर, मुलाचा मृत्यु.
मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली
✒नीलम खरात, मुंबई प्रतिनिधी ✒
मुंबई,दि.24 जुन:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळे कुरतडलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना बेशुद्धावस्थेतील रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडल्याची गंभीर बाब मंगळवारी समोर आली होती. मात्र बुधवारी रात्री नऊ वाजता 24 वर्षीय श्रीनिवास यल्लपा याचा मृत्यु झाला. श्रीनिवास याला श्वास घेताना दम लागत असल्यामुळे चार दिवसांपूर्वी घाटकोपरमधील महानगर पालिकेच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. श्रीनिवास यांची स्थिती गंभीर असल्याने त्याला आय.सी.यु मध्ये ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान हा खळबळजनक प्रकार घडला. राजावाडी रुग्णालयातील आयसीयू रुममध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा वावर असल्याचे इतर रुग्णाच्या नतेवाईकांनी सांगितले पण रुग्णालय प्रशासन आणि महानगर पालिका प्रशासन या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करत आहे.
*ही घटना नेमकी काय होती*
मुंबईतील श्रीनिवास यल्लपा या वय 24 वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी महानगर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मेंदूज्वर आणि किडनीचा त्रास असल्याने या रुग्णाला राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. काल सकाळी नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचं दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला.
श्रीनिवासच्या डोळ्यांचा मंगळवारी उंदराने चावा घेतला होता, बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्याचे निधन झाले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती अधिष्ठात्या विद्या ठाकूर यांनी दिली.
*मेंदूज्वर झाल्याने रुग्णालयात उपचार*
श्रीनिवास यलप्पाला श्वास घेताना त्रास होत होता. त्रास असह्य झाल्यानंतर त्याला रविवारी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला मेंदूज्वराचे निदान झाले. तसेच त्याचे यकृतही बिघडल्याचे समोर आले. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच मंगळवारी सकाळी श्रीनिवासच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे त्याच्या नातेवाईकांना दिसले. नातेवाईकांनी निरखून पाहिले असता श्रीनिवासच्या डोळ्यांना उंदराने कुरतडले असल्याचे समजले.
*नर्सकडून कुटुंबीयांना उद्धट उत्तरे*
हा प्रकार समजल्यानतर तरुणाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्सना जाब विचारला. मात्र त्यांच्याकडून उद्धट उत्तरे मिळाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. हा प्रकार सर्वत्र समजल्यानंतर राजावाडी येथील मनपा रुग्णालय प्रशासनावर सडकून टीका झाली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीबद्दल सर्वत्र संतापाची लाट उमटली. रुग्णालयात उपचार सुरु असलेले इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले होते.