चंद्रपुर मध्ये डेंग्यु ची सुरुवात,३० टक्के घरांमध्ये सापडली डासांची अंडी

रवि दिलीप आत्राम

भद्रावती शहर प्रतिनिधि

मोबाईल क्रमांक – ९८९०८९७०२९

सविस्तर या प्रमाणे आहे कि डेंग्यु व इतर किटकजण्य आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी चंद्रपुर शहर महानगर पालिका मार्फत घरोघरी केल्या जाणारया कंटेनर सवैमध्ये ३० टक्के घरांमध्ये डासांची अंडी आढळली आहेत

सध्या पावसाळ्यांची सुरुवात असुन डेंग्यु व इतर किटकजण्य आजार पसरु नये या दृष्टिने मा.न.पा मार्फत प्रतीबंधात्मक उपयोजना करण्यात येत आहेत.मा.न.पा आरोग्य विभाग मार्फत एमपीडब्ल्यू एनएम व आशा वर्कर द्वारे डासअळी उगमस्थाने शोधुन नष्ट करण्यात कंटेनर सर्वे राबवीला जात आहे अंतर्गत आत्ता परियंत १०८८५ घरांची तपासणी करण्यात आले असुन यात ३० टक्के घरे दुषीत आढळली आहेत हे प्रमाण मोठे असल्याणे सर्वानीच सावधगीरी बाळगणे आवश्यक आहे.

डेंग्युचा डास हा साचलेल्या पाण्यात आढळतो त्या मुळे आपल्या घराची तपासणी करा.कुलर,टायर भंगारातील वस्तु डब्बे यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी पाणी साठवण्याची भांडी कोरडी करा. डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाका पाणी साठा जास्त मोठा असेल तर त्यात गप्पी मासे टाका गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी खाऊन टाकतात ज्याणे डासांचा प्रदुरभाव कमी होतो डेंग्यु हां जीवघेणार आजार आहे असल्याचे लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे वाढिला प्रतीबंध हाच सर्वात उत्तम उपाय आहे डेंग्यु रोगासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहण चंद्रपुर माहानगर पालिके मार्फत करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here