मुंबई पोलिस हाय अलर्ट वर

मुंबई पोलिस हाय अलर्ट वर

मुंबई पोलिस हाय अलर्ट वर

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी, यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या निमित्ताने पोलिसांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनीही त्यांच्यातील खदखद या निमित्ताने बाहेर काढली. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक चांगलाच आक्रमक झाला आहे.