राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीचे चंद्रपुरात स्वागत
भारतीय जनता पार्टी तथा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर तर्फे जल्लोष
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-9860020016
चंद्रपूर : – प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे नेहमी आपल्या निर्णयाने लोकांची मने जिंकत असतात त्याचाच प्रत्यय यंदाही राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडतांना आला यावेळी त्यांनी महामहीम राष्ट्रपती पदासाठी एन. डी. ए चे उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केली आहे ही निवड भारतासाठी अभिमानाची बाब आहे ह्या एतिहासिक निर्णयाचे चंद्रपुरात भारतीय जनता पार्टी तथा महिला मोर्चा महानगर चंद्रपूर तर्फे महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करून स्वागत करण्यात आले व प्रचंड मताधिक्याने एन. डी. ए च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ह्या विजयी होतील व हा इतिहास रचला जाईल असे भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी भावना व्यक्त करतांना सांगितले सदर जल्लोष कार्यक्रमांत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे,चंद्रपूर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अंजली घोटेकर, महामंत्री सुभाष कासनगोट्टवार,रवींद्र गुरनुले,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, सोपान वायकर, छबू वैरागडे,चंद्रकला सोयाम, शिला चव्हाण, माया उईके,शीतल गुरनुले,कल्पना बगुलकर,शीतल कुळमेथे,संगीता खांडेकर,शीतल आत्राम,अनुराधा हजारे,पुष्पा उराडे,विनोद शेरकी,अमीन शेख, संदिप आगलावे,रवी चहारे, चांद पाशा, सूर्या खजांची,राजेंद्र खांडेकर,अमित निरंजने,शैलेश इंगोले,महेश कोलावर,नितिन करिय,माया मांदाडे,रेणुका घोडेस्वार, मोनिशा महातव,प्रभा गुळधे,मंजुश्री कासनगोट्टवार,सारिका संदुरकर,रेखा मडावी, सुलभा पेंदाम, आशा देरकर, दर्शना उराडे,सीमा मानकर,रमिता यादव,यशोधरा जांभूळकर,वैशाली पाटील, वर्षा सोमलकर,सुषमा नक्षणे,भूमी चिंतलवार,रंजीता येले,नूतन मेश्राम,अनिता पुसाम,सीमा मडावी,सपना सोयाम,निर्मला आत्राम,प्रीती दडमल,जयश्री आत्राम,अरविंद मडावी,रवींद्र तुमराम, विकास पेंदाम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती