मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो, कारण…

मीडियावार्ता

२४ जून, मुंबई:मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबई पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांची बैठक पार पडली. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना काही महत्त्वाची विधान केली.

  • मी मुद्दाम मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसलो होतो. “तुम्ही मुफ्तींसोबत बसला होता तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होतं का ? तुमचं सुटलं नव्हतं मग आमचं कसं सुटेल. आम्ही हिंदुत्व सोडणार नाही मात्र तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही !
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. हे वर बसलेले दलाल महाराष्ट्राची राजधानी लुटत आहेत. मुंबई मॉडेलचं जगात कौतुक झालं. पण या नालायकांना त्याचं कौतुक नाही !
  • टाटाने कोव्हिड काळात पीएम केअर फंडाला दीड हजार कोटी दिले होते, ते कुठे गेले?
  • कोव्हिड काळातील भ्रष्टाचार जरूर काढा. देशभरात जे सर्व्हे झाले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही त्यांची पोटदुखी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना जमाल गोटा द्यायचा आहे. त्यांना घोड्याचंच औषध द्यावे लागेल. तरच त्यांचा कोठा मोकळा होईल !
  • शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत !

https://mediavartanews.com/2023/06/24/how-to-save-yourself-from-cyber-crime/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here