पुढे ६० वा वर्धापन दिनसुद्धा नक्कीच साजरा करू असा आशावाद झाला याच ६व्या वर्धापन दिनी व्यक्त, कविसंमेलनात उमटल्या वृद्धांच्या वेदना

कृष्णकुमार निकोडे

गडचिरोली, दि.२३ जून: स्थानिक झाडीबोली साहित्य मंडळाचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून ते पुढे ६० वा वर्धापन दिन सुध्दा निश्चित साजरा करेल असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन डॉ.देवेंद्र मुनघाटे यांनी केले.

गडचिरोली येथील झाडीबोली साहित्य मंडळाचे चाललेले कार्य कौतुकास्पद असून ते पुढे ६० वा वर्धापन दिन सुध्दा निश्चित साजरा करेल असा मला विश्वास आहे. असे प्रतिपादन डॉ.देवेंद्र मुनघाटे यांनी केले. ते झाडीबोली साहित्य मंडळाच्या ६ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षपदावरुन बोलत होते. पुढे त्यांनी शेतकऱ्यांना आजची व्यवस्था कशी लुटते याबाबतचे अनेक किस्से आपल्या विडंबन कवितेतून सांगून रसिकांना रिझविले. गडचिरोली येथील मातोश्री वृध्दाश्रमात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांचे पद डॉ.चंद्रकांत लेनगुरे, डॉ.किरकिरे सर, प्रा.विनायक धानोरकर यांनी भुषविले होते. सहा वर्षांत मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी सादर केला.

याप्रसंगी कविसंमेलन सुद्धा घेण्यात आले. यात १५ कवींनी सहभाग घेतला होता. यात डॉ.किरकिरे यांनी कवितेतून वृद्धांची व्यथा मांडली तर उपेंद्र रोहणकर यांनी योगदानाचे महत्व, मारोती आरेवार यांनी बाप, संजय बोरकर यांनी तुझा होकार आल्यावर ही गझल, प्रतिक्षा कोडापे यांनी संविधान, गजानन गेडाम यांनी आठवणी लहानपणीच्या, डॉ.चंद्रकांत लेनगुरे यांनी आमचा संसार, विनायक धानोरकर यांनी झाडपे ही झाडीपट्टीतील रचना गाऊन सादर केली. खेमदेव हस्ते यांनी मोबाईल या कवितेतून मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले.

सदर कार्यक्रमाचे संचालन मारोती आरेवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक्षा कोडापे यांनी केले. याप्रसंगी वृद्धाश्रमातील बंधुभगीनी व अरूण देवळेकर, भुरकाबाई रोहणकर, चांदेकर इत्यादी मंडळीनी कविसंमेलनाचा मनमुराद आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here