नेरळ राजमाता जिजामाता तलाव; दोन कोटी रुपये खर्च करूनही गेले पाण्यात?
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून अमृत सरोवर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातून सध्या नेरळ ग्रामपंचायत मधील राजमाता जिजामाता तलाव येथे अमृत सरोवर सुशोभीकरण करण्याचे काम केले जात आहे. पण तब्बल दोन कोटी रुपयांच्या खर्चातून राजमाता जिजा तलाव येथे संरक्षण भिंत, तलावाचे खोलीकरण व इतर कामे मंजूर होती. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाने नोव्हेंबर २०२१ मध्ये कामाला मंजुरी दिली होती. त्यानंतर त्या कामाची मुदत वर्षभराची होती आणि नेरळ येथे ग्रामपंचायत तलाव लागलेल्या फलकावर निर्देशित केले आहेत. मात्र आज २०२४ वर्षे सुरुवात असून त्याप्रमाणे अमृत सरोवर अभियानातून सुरू असलेले काम हे दोन वर्षांपूर्वीच मंजूर काम आहे. मग ते बांधकाम तब्बल दोन वर्षानंतर का सुरू होत आहे? आणि त्यासाठी जिल्हा जल संधारणा विभागाने कशी मंजुरी दिली? असा प्रश्न स्थानिकान कडून उपस्थित केला जात आहे.
मात्र नेरळ ग्रामपंचायत मध्ये तब्बल दोन कोटी खर्च करून बांधण्यात येत असलेले राजमाता जिजाऊ तलावात उभारण्यात आलेली भिंत हि पहिल्याच पावसात कोसळली आहे. त्यामुळे दोन वर्ष उशिरा बांधकाम केले जात असताना मागील दीड महिन्यात करण्यात आलेले बांधकाम हे पाहिल्यावर निष्कृष्ट कामाचा नमुना या ठिकाणी दिसून येत आहे. व त्यामुळे शतपावली/व्यायाम करण्यास आलेल्या प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात शासकीय यंत्रणा हि सध्याच्या कामाचा दर्जा पाहणी करण्यासाठी आलेली दिसून येत नाही तरी चौकशी करण्याची मागणी होत आहे.