शिवसेना नेरळ शाखा यांच्या वतीने शालेय शासकीय दाखले शिबीर संपन्न

शिवसेना नेरळ शाखा यांच्या वतीने शालेय शासकीय दाखले शिबीर संपन्न

शिवसेना नेरळ शाखा यांच्या वतीने शालेय शासकीय दाखले शिबीर संपन्न

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

नेरळ :- आमदार महेंद्र थोरवे फाऊडेशन, शिवसेना नेरळ शाखा व तहसील कार्यालय कर्जत यांच्या संयुक्त विधमाने नेरळ अंबेमता हॉल येथे दिनांक २४ जून २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यत शासकीय दाखले शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करणात आले असून शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार घाण्यात आले तसेच नंदू कोळंबे व प्रभाकर देशमुख यांनी बाळा साहेंबानच्या प्रतिमेस पुष्पहार घातले, सचिन खडे यांच्या हस्ते आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले.

व्यासपीठावर संभाजी जगताप बोलले शासन आपल्या दारी या व्दारे नेरळ येथील विद्यार्थी शासकीय दाखल्यांचे वाटप करणार आहोत. आज दाखले वाटप करण्यासाठी जे आयोजन केले त्या साठी शहर प्रमुख, संपर्क प्रमुख, सर्व पदाधिकारी यांना खूप-खूप शुभेच्छा देतो. शिवसेनेचे एक वाक्य आहे कि २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण त्या रुत्ती प्रमाणे आपण हा कार्याकार्म राबविला आहे. ज्या मुलांना व वडिलांना तहसील कार्यालयात हेलपाटे मार्वे लागतात म्हणून हे काम हाती घेतले म्हणून त्यांना मी शुभेच्छा देतो व प्रभाकर देशमुख यांचे विशेष आभार मानले. मंचावर सरपंच उषाताई पारधी व आदी मान्यवर उपस्तीत होते. तर प्रमोद कराळे, देवेंद्र दाबणे, अमोल फड, सुरज साळवी, जयवंत साळुंखे यांनी मुलांना अर्ज भरण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. नेरळचे तलाठी विकास गायकवाड उपस्तीत असून मनोज भोईर हे सेतू कार्यालय कर्जत येथून आले होते.

एकंदरीच पाहता मोठ्या संखेने शालेय विध्यार्थी व पालक यांनी शालेय दाखल्यासाठी गर्दी केली होती. तसेच जेवणाची व्यवस्था केली होती. त्यातील योग्य पुरावे सादर केलेल्या दाखल्याचे वाटप; उत्पन्नाचे दाखले १५२, वय अधिवास प्रमाणपत्र २, जेष्ठ नागरिक २०, EVS दाखले २, नॉन क्रिमिलेअर ५ अशे एकंदरीत २०१ दाखले हे तीन दिवसांनी दिले जाणार आहेत असे प्रभाकर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख- संभाजी जगताप, नेरळ शहर प्रमुख- प्रभाकर देशमुख, संपर्कप्रमुख- किसन शिंदे, जिल्हा सचिव- नंदूशेठ कोलंबे, उपशहर- प्रमुख सचिन खडे, पंढरी शेठ, माजी ग्रामपंचायत सदस्य जयवंत साळुंखे, सुनील पारधी, मनोज मानकामे, सुभाष मिनीने, ग्रामपंचायत सदस्या गीतांजली देशमुख, उमा खडे, जयश्री मानकामे, युवा सेना- प्रमोद कराळे, सुनील शिंगवा, दर्शन खडे, आकाश खडे, महिला आघाडी- वर्षा काटे जयश्री कडे केतकी सावंत छाया पाटील सचिन जाधव योगेश ठक्कर उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here