प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावा
• हंसराज अहिर यांचे निर्देश
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 24 जून
चंद्रपूर जिल्ह्यातील सिध्दबल्ली परसोडा लाईमस्टोन माईन्स, केपीसीएल तसेच अरबिंदो कंपनीशी संबधित ओबीसी व अन्य प्रवर्गातील शेतकरी, नागरिकांचे प्रलंबित प्रश्न, समस्या व कंपनी प्रबंधनाद्वारे सुरू असलेल्या अन्यायी धोरणाबाबत जिल्हाधिकारी व प्रशासनातील वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीत अहिर यांनी आढावा बैठक घेवून प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात 24 जून रोजी अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, चंद्रपूर उपविभागीय अधिकारी पवार, वरोडा उपविभागीय अधिकारी लंगडापुरे, सहायक कामगार आयुक्त, भूअर्जन अधिकारी व अन्य विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांची उपस्थिती होती.
वेकोलि क्षेत्रातील तुकडेबंदी कायदा अवहेलना प्रकरणातील फेरफार राज्य सरकारच्या 2017 च्या सुधारीत शासन निर्णयानुसार ग्राह्य धरण्यात यावे तसेच भटाळी, पाटाळा व अन्य प्रकल्पातील एक 7/12, दोन आराजी, प्रकरणामध्ये विक्रीच्या आधारावर मालकी मान्य करून, दोन नोकर्या मंजूर करण्याचे निर्देश वेकोलि प्रबंधनास द्यावेत, अशी सूचना अहिर यांनी केली. तसेच सास्ती विस्तारीकरण परियोजना, बल्लारपूर क्षेत्राची आर/आर लाभ यादी तातडीने मंजूर करण्यात यावी जेणेकरून प्रकल्पग्रस्तांचे नोकरी प्रस्ताव वेकोलिद्वारे मार्गी लागतील असे सांगीतले.
सिध्दबल्ली कंपनीतील जुन्या कामगारांची देय राशी व त्यांच्या नोकरीविषयी अनेकदा बैठका होवूनही प्रबंधन याप्रश्नी गंभीरपणे कार्यवाही करीत नसल्याने जिल्हाधिकार्यांनी याविषयी गंभीर दखल घेवून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याप्रकरणी लवकरच सिध्दबल्ली अधिकार्यांसोबत बैठक बोलावण्याची सुचना जिल्हाधिकार्यांना एनसीबीसी अध्यक्षांनी केली. यावेळी केपीसीएल प्रश्नांवर चर्चा झाली. पुनर्वसन तसेच वनजमिनीवर उत्खनन याबाबत जिल्हा प्रशासनाने माहिती घेवून कायदेशीर प्रक्रीया राबविण्याची सुचना अहिर यांनी केली.