या तालुक्यात 6 ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार
• नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
नागभीड : 24 जून
नागभीड तालुक्यातील आठ ग्रामपंचायत मधील सरपंच पदाची आरक्षण सोडत सोमवार, 24 जून रोजी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. 6 ग्राम पंचायतींवर महिलाराज येणार आहे.
नवेगाव पांडव एसटी महिला, उश्राळा मेंढा खुला प्रवर्ग महिला, गंगासागर हेटी ग्राम पंचायतींवर नामात्र महिला, खडकीमध्ये अनुसूचित जमाती महिला, येनुलीमाल खुला प्रवर्ग महिला, सोलापूर तुकूम खुला प्रवर्ग, वासाडा मेंढा अनुसूचित जाती महिला व किटाळी मेंढा नामाप्र खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
ग्रामपंचायतीच्या सरपंचाची आरक्षण सोडत जाहीर झाल्याने आता तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणुकीचे वारे वाहणार आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आरक्षण सोडतीनुसार सरपंचपदाचा उमेदवार शोधण्यात व्यस्त होणार असून, इच्छुकही आपल्या पदरी उमेदवारी मिळावी, यासाठी रस्सीखेच करणार आहेत.