“लेक भीमाचा, भंडारेंचा राहुल.! – अरुण निकम

90

अद्वैत थिएटरचे निर्माता राहुल भंडारे ह्यांना नितिन गडकरी साहेब ह्यांच्या हस्ते  प्रयोगशील निर्माता पुरस्कार मिळाला.

“लेक भीमाचा, भंडारेंचा राहुल.!”

राहुल, राहुल राहुल, 

तुझ्या कर्तृत्वाने,

पसरलय सर्वदूर काहूर, 

पाहून प्रगती, तुझी निरंतर, 

गर्वाने भरभरून, आलाय ऊर, 

अभिमानाने उमटले,

आनंदमय सूर.!

 

राहुल, राहुल, राहुल  

रंगलाहेस , कौतुकाच्या रंगात,

भीमाच्या लेकराचे, कौतुक पहात, 

नाचतोय मोर, 

हरेकांच्या, मन मंदिरात .!

 

राहुल, राहुल, राहुल, 

नाही केलीस पर्वा, गरिबीची, 

नच विन्मुख झालास, 

येता अडचण दीडक्यांची,

असता वानवा अनुभवाची, 

परंतु होती जिद्द,

अन तयारी कष्ट उपसण्याची.!

 

राहुल, राहुल, राहुल  

:वेड्यापरी भारावल्या शिवाय ,

यशाचे शिखर, 

गाठता येत नाही .”

ह्यावर ठाम विश्वास आहे तुला, 

करीत कैक अडचणींवर मात, 

निश्चयावर ठाम रहात, 

नुकतीच दिसू लागली, 

यशाची पहाट.!

 

राहुल, राहुल, राहुल  

भल्याभल्यांना जमली नाही, 

लहान वयात, मारलीस उडी मोठी, 

कारण आहेत आशिर्वाद, 

बाबांचे पाठीं,

नव कलावंतां साठी 

बनलास आधाराची काठी.!

 

राहुल, राहुल, राहुल, 

“अद्वैत” ने केली कमाल सरस,

नुकताच सन्मानित झालास, 

मिळवून अवॉर्ड फेमस 2025,

अभिनंदन करतांना, शब्द गोठवलेस,

नम्र विनंती, चरणी तथागत,

असे प्रसंग अभिनंदनाचे, 

वारंवार अन सदोदित येऊ देत.!

 

असे प्रसंग अभिनंदनाचे ,

वारंवार अन सदोदित येऊ देत!!

असे प्रसंग अभिनंदनाचे, 

वारंवार अन सदोदित, येऊ देत. !!!

 

अरुण निकम, मुंबई

मो: 9323249487