योग दिनानिमित्त सर्वोदय कन्या विद्यालयात आरोग्याचा संदेश.

योग दिनानिमित्त सर्वोदय कन्या विद्यालयात आरोग्याचा संदेश.

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
मो.8806689909

सिंदेवाही :- “आरोग्यम् धनसंपदा” या घोषवाक्याला साकार करत सर्वोदय कन्या विद्यालय, सिंदेवाही येथे आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने साजरा करण्यात आला. शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या आनंद, ऊर्जा आणि समर्पण यामुळे संपूर्ण परिसर सकारात्मक ऊर्जेने भारलेला दिसत होता.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक प्रार्थनेने झाली. त्यानंतर उपस्थितांनी सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम व ध्यान यांचे सादरीकरण केले. योग प्रशिक्षिका इंद्रायणी सैनी मॅडम यांनी योगाचे शास्त्रीय महत्व, त्याचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका संगीता यादव मॅडम, मुख्याध्यापक अतुल केकरे सर,पर्यवेक्षक विलास धुळेवार ,सुनिल सुकारे उपस्थित होते. शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष योगेंद्रजी जयस्वाल, सचिव अरविंदजी जयस्वाल यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वांनी दररोज योगाभ्यास करण्याचा संकल्प करीत कार्यक्रमाची सांगता केली.