विजेच्या धक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्याने शेतकऱ्याचा मृत्यू

अंगावर विज प्रवाहाची तार पडल्याने घडली घटना

प्रशांत नार्वेकर
अलिबाग प्रतिनिधी
९१५८९९६६६६

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील बोरपाडा येथील 62 वर्षीय शेतकऱ्याचा मंगळवारी (दि.24) सकाळी विजेच्या झटक्याने मृत्यू झाला. शेतावरील गोठ्याकडे दुचाकीने जात असताना अंगावर विजेची तार पडून ही घटना घडली. सुदैवाने त्याच्या मागे असलेल्या पत्नीचा जीव बचावला.

वसंत रघुनाथ पाटील (62) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून पत्नीसोबत शेतावरील गोठ्याकडे जात होते. दरम्यान बोरपाडा येथील मराठी शाळेजवळ आल्यावर वसंत पाटील यांच्या अंगावर अचानक विजेची तार पडली. मानेवर तार पडल्याने विजेचा जोरदार झटका त्यांना लागला. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.