मुंबई गोवा मार्गांवर भीषन अपघात
एकाचा मृत्यू,तीनजन जखमी,अपघातांची मालिका सुरूच
✍️तेजपाल जैन ✍️
कोलाड प्रतिनिधी
📞8928847695📞
कोलाड :- मुंबई गोवा महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे तर मुंबई गोवा महा-मार्गावर सोमवारी रात्री दीडच्या सुमारास खांब हद्दीतील एच पी पेट्रोल पंप समोर सुजुकीकार उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडकल्याने हा अपघातात घडला असून सदरच्या घटनेत एकजण ठार झाला असून तीनजण गंभीर जखमीं झाले आहेत.तर राष्ट्रीय महामार्गवर सततची अपघातांची मालिका सुरूच असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे.
याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलीस ठाणे हद्दीत फिर्यादी अमित विजय करपे,रा खडक पाडा कल्याण वेस्ट यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार, सोमवारी रात्री दीड च्या सुमारास सिद्धेश योगेश शिंदे खडक पाडा कल्याण वेस्ट हे आपल्या ताब्यातील सुजूकी सियाज गाडी क्र एम एच ०५/ई ए २५०५ यांनी ही कार चिपळूण ते कल्याण अशी मुंबई-गोवा महामार्ग वरून चालवीत घेऊन येत असताना मौजे खांब गावच्या हद्दीत येताच एच पी पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रेलर क्र. एम एच ४६/बी यु ४०१४ यास मागील बाजूस ठोकर मारून हा अपघात घडला तर घडलेल्या अपघातात आदित्य दिपू वर्मा वय ३८ रा. कमला देवी कॉलेज हेरीटेल ठाणे हे ठार झाले आहेत. तर निलेश राधानी वय २५ रा कल्याण, सिद्धेध योगेश शिंदे वय २६ वर्ष खडक पाडा कल्याण वेस्ट, तसेच फिर्यादि अमित विजय करपे,रा खडक पाडा कल्याण वेस्ट हे तिघेजन गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहीती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच अपघात ग्रस्तांना येथील स्थानिक SVRSS रेस्क्यू टीम या संस्थेने मदत केली तर याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र नंबर ५४/२०२५ भादवि कलम २०२३ चे कलम १०६ (१), २८१,१२५ (अ) १२५ (ब) मो या का कलम १८४ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोसई गायकवाड करीत आहेत.