पार्किंग वाढीसाठी स्थानिकांचे श्रमदान

पार्किंग वाढीसाठी स्थानिकांचे श्रमदान

✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान , शहर प्रतिनिधी
मो.8793831051

माथेरान :- माथेरानमध्ये पर्यटकांच्या गाड्या पार्क होणाऱ्या एकमेव वाहनतळावर पर्यटकांच्या जास्तीत जास्त गाडया उभ्या राहव्या यासाठी येथील स्थानिकांनी श्रमदान केले त्यामुळे आता पर्यटकाना तासन्तास घाटरस्त्यात ताटकळत बसावं लागणार नाही.सर्व स्थानिकांनी केलेल्या या श्रमदानामुळे येणाऱ्या पिढीला नवा आदर्श सुद्धा घालून दिला असल्याचे बोलले जात आहे.

               मागील 20 दिवसांपासून माथेरानमध्ये पर्यटकांच्या खाजगी वाहन मोठ्या प्रमाणात येथे आल्यामुळे घाटरस्त्यात ट्राफिक होऊन पर्यटकांना ताटकळत थांबावं लागलं होतं.हा प्रकार मागील तीन ते चार वर्षापासून सुरू होता.प्रत्येक पर्यटन हंगामात घाटरस्त्यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा असायच्या पार्किंग कमी आणि गाड्या जास्त अशी परिस्थिती होती.वन विभाग,वन व्यवस्थापन समिती आणि नगरपालिका यांच्या पुढे हा गंभीर प्रश्न सतावत होता.या पार्किंग मध्ये वाहन तळ न वाढवता याच ठिकाणी जास्तीत जास्त गाड्या कशा लागतील याचा आढावा मागील काही दिवसात घेण्यात आला.त्यावेळेला दोन चाकी गाड्यांचे पार्किंग काढून डिफॉरेस्ट असलेल्या रस्त्यावर साफसफाई करून जास्तीत जास्त चार चाकी गाडया लागतील असा सर्व्हे करण्यात आला मात्र प्रशासनाकडे इतके मनुष्यबळ नसल्याने स्थानिकांच्या मदतीने श्रमदान करून हा डिफॉरेस्ट रस्ता पार्किंगसाठी करावा.या अनुषंगाने सर्व पक्ष,संघटना,वन विभाग,वन व्यवस्थापन समिती,नगरपालिका यांनी एकत्र येत दि.24 रोजी या वाहनतळामध्ये असलेल्या या रस्त्यावर सर्वांनी एकत्र येत सकाळी 11 वाजल्यापासून श्रमदान करून हा रस्ता पार्किंगसाठी तयार केला.

                     या श्रमदानात माथेरान नगरपालिका,वन विभाग,वन व्यवस्थापन समिती,भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट,दोन्ही शिवसेना,काँग्रेस यांनी एकत्र येत आपला सहभाग नोंदवला.

———————————————————————

गाव करील ते राव काय करील?या म्हणीनुसार आज पूर्ण स्थानिक हे आपले मतभेद बाजूला ठेऊन हे श्रमदान केले आहे त्यामुळे नगरपालिकेतर्फे मी सर्व स्थानिक लोकांचे मी अभिनंदन करतो.आता प्रशासनाकडून तातडीने पथदिवे आणि सीसीटीव्ही लावण्याचे प्राथमिक काम पूर्ण करून म्हणजे येणाऱ्या विकेंड पासून ही पार्किंग पर्यटकांसाठी खुली होईल.

                                      राहुल इंगळे,प्रशासक तथा मुख्याधिकारी

  ——————————————————————-

मागील दोन विकेंडला पर्यटकांच्या गाड्यांना पार्किंगसाठी खूप त्रास सहन करावा लागला.या साठी आम्ही सर्व्हे केला. जी पार्किंग आहे यामध्येच गाड्या जास्तीत जास्त कशा लागतील याचे नियोजनबद्ध सर्व्हे करण्यात आला.आणि सर्व पक्षीय लोकांनी श्रमदानाने हा डिफॉरेस्ट रस्ता खुला केला.यामुळे शंभर ते दीडशे गाड्या या ठिकणी बसू शकतात.

                          योगेश जाधव,अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती