ट्रकद्वारे बेकायदेशीररीत्या प्राण्यांच्या हाडांची वाहतूक; दोन आरोपी अटकेत

ट्रकद्वारे बेकायदेशीररीत्या प्राण्यांच्या हाडांची वाहतूक; दोन आरोपी अटकेत

अभिजीत आर. सकपाळ
ठाणे / भिवंडी प्रतिनिधी
9960096076

भिवंडी :- भिवंडी शहरातील धामणकर नाक्याजवळ पोलिसांनी एका ट्रक मधून बेकायदेशीररीत्या प्राण्यांच्या हाडांची वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार ट्रक क्रमांक MH-16-AE-4059 मध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांच्या हाडांची बेकायदेशीर वाहतूक होत होती. या हाडांसाठी कोणतेही वैध कागदपत्र अथवा शासकीय
परवानगी नव्हती. वाहनात सवार असलेल्या व्यक्तींची ओळख सलीम रफीक कुरेशी (रा. दरगाह रोड) आणि अबू सौद इक्बाल अहमद अन्सारी (मूळ रा.मालेगाव) अशी झाली आहे.अबू सौद हा ट्रकचालक आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२५. २७१. तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९५६ मधील कलम ५. ५ (अ), ५ (ब), ५ (क). ६. ९. ९ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपींकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना ते प्राण्यांचे अवशेष, विशेषतः हाडे, वाहून नेत होते. पोलिसांनी सदर ट्रक तात्काळ जप्त केला असून, जप्त हाडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही हाडे नेमकी कुठून आणली गेली आणि कुठे नेत होते, याचा तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ललित केदार करीत आहेत.