अंगावर वीज पडल्याने तरुणी जखमी तारसा खुर्द शेतशिवारातील घटना.

अंगावर वीज पडल्याने तरुणी जखमी तारसा खुर्द शेतशिवारातील घटना.

जखमी तरुणीला ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे उपचाराकरिता केले दाखल.

अंगावर वीज पडल्याने तरुणी जखमी तारसा खुर्द शेतशिवारातील घटना.
अंगावर वीज पडल्याने तरुणी जखमी तारसा खुर्द शेतशिवारातील घटना.                                                                                     

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपीपरी:- सवीस्तर माहिती अशी की तालुक्यातील तारसा खुर्द येथील शेत शिवारात काम करताना तरुणीच्या अंगावर वीज पडल्याने ती जखमी झाली आहे.

गोंडपीपरी तालूक्यात मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. शेतीला पूरक पाऊस पडल्याने शेतकामा ला वेग आला आहे.पावसा अभावी रखंडेलेली रोव्हणीची कामे जोमाने सुरू झाली आहे.

अश्यातच मौजा तारसा खुर्द येथिल 20 वर्षीय तरुणी रोव्हनी करण्याकरिता शेतात गेली असता मेघ गर्जनेस वीज कडाडली अन तरुणीच्या अंगावर वीज कोसळल्याने विजेचा तिला जखमी अवस्थेत उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे हलविण्यात आले . ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे योग्य उपचार करून प्रकृती सुधारल्याने शुक्रवारला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे.