राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा वृक्ष संवर्धन सप्ताह आयोजित.

✒️आशीष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
नागपुर,दि.24 जुलै:- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच महाराष्ट्र राज्य द्वारा वृक्ष संवर्धन सप्ताह आयोजित करण्यात आला होता. आज मोठ्या प्रमाणात वृक्षाची कतल करुन सिमेंट कॉक्रेटच जंगल उभारल्या जात आहे. त्यामुळे आज विश्व पतनाकडे जात आहे. म्हणुन वृक्षारोपन करुन त्याच संवर्धन करणे आज अगत्याचे झाले आहे असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच तर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
आपल्याला प्राण वायु, पाऊस, आणि उन्ह या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आज प्रत्येकाने एक वृक्षाची लागवड करुन त्याचे संर्वधन करावे म्हणुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक युवती विचार मंच नागपूर कार्यकारणी सदस्या तर्फे अयोध्या नगर पोस्ट ऑफिस जवळ वृक्षारोपणाचा उपक्रम राबवीण्यात आला. त्यामध्ये नागपुर जिल्हा उपाध्यक्ष राणी लाडसे, नागपूर जिल्हा प्रवक्ता वैष्णवी अतकरे, नीतू कोल्हे, रीना लाडसे, राम कापगते, प्राप्ती माने, अर्पिता आणि इतर अनेक कार्यक्रते उपस्थित होते.