*विरुर स्टे इथे अवैध धंद्यांना उत येथील स्थानिक पोलीस विभागाचे दुर्लक्ष*

संतोष मेश्राम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण 9923497800
विरूर स्टे तालुका राजुरा. विरूर स्टे इथे बार आहे आणि बार मध्ये प्रिंट रेट पेक्षा 60 ते 70 रू.जास्त दराने दारू विकण्यात येत आहे.आणि बंद या दिवशी 150 रू जास्त दराने दारू विकण्यात येत आहे इथे असलेले बार शनिवार रविवारला बंद असतात.त्या दरम्यान बार मधून अगोदर पेट्या पार्सल घेऊन बार च्या समोरासमोरच बसून दारू विकतात आणि त्या दरम्यान बार समोर खुले आम् विदेशी दारू विकण्यात येत आहे .तरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी या अवैध्य धंद्या कडे जाणूनबुजून परस्पर दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे . व बार मालकाने सुध्धा आपल्या बार समोर कुणालाच अवैध दारू विकण्याकरीता देऊ नये आणि विकल्यास पोलीस अधिकारी यांनी यात जातीने लक्ष घालून. कार्यवाही करण्यात यावी .आणि मार्केट मध्ये देसी भट्टी असून बंद या दिवशी 6-7 मुले खुले आम् दारू विकतात.आणि देशी भट्टी चे मालक त्यांना देशी चे पेट्या अगोदर देऊन ठेवत असतात .आणि ग्रामीण गावातील सुध्दा देशी भट्टी मधून रोज 10 ते 15 पेट्या पार्सल होत आहे असे गावकर्या चे बोलणें आहे.तरी पोलीस प्रशासन या प्रकाराकडे जाणुनबुजून हेतु परस्पर अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष करीत आहे असे दिसून येते