वर्धा जिल्हात डेंग्यूने थैमान, हजारच्यावर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत.

वर्धा जिल्हात डेंग्यूने थैमान, हजारच्यावर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत.

वर्धा जिल्हात डेंग्यूने थैमान, हजारच्यावर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत.
वर्धा जिल्हात डेंग्यूने थैमान, हजारच्यावर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आहेत.

✒️आशीष अंबादे ✒️
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा/कारंजा(घाडगे),दि.23 जुलै:- वर्धा जिल्हातील अनेक शहरामध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. हजाराच्यावर डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण समोर आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आरोग्य विभाग तो डेंग्यू नव्हेच, अशी भूमिका घेऊन हात झटकत आहे.

वर्धा जिल्हातील कारंजा(घाडगे) शहरांमध्ये 900 च्या वर डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे सर्वत्र बोलले. शहरातील रुग्णालये रुग्णांच्या गर्दीमुळे हाऊफुल्ल झाले असताना, तालुका आरोग्य प्रशासन मात्र हे सत्य स्वीकारायला तयार नाही. तालुका आरोग्य प्रशासनाच्या मते तालुक्यात भीतीदायक परिस्थिती नसून, खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टर एनएस म्हणजेच नॉन स्पेसिफिक टेस्ट करायला लावतात. ती चाचणीच योग्य नसल्याचे आरोग्य प्रशासनाचे म्हणणे आहे. मागील पंधरवड्यात खासगी लॅबमध्ये तपासणी करण्याकरिता जाणाऱ्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. संपूर्ण शहरामध्ये एक हजारच्या जवळपास रुग्णसंख्या आहे. यामध्ये लहान व तरुण मुला-मुलींचे प्रमाण अधिक पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ईतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत असताना आरोग्य यंत्रणेने याची दखल घेणे गरजेचे असताना यंत्रणा हात वर करीत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये रक्त तपासणी होत नसून, रक्त नमुना घेतला जातो. तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात वर्धा येथे अहवाल पाठविला जातो. अहवाल येण्यास तीन-चार दिवस लागतात. त्यामुळे जो रक्त नमुना अहवाल शासकीय रुग्णालयांमधून पाठविला जातो, त्यावरच आरोग्य यंत्रणा विश्वास ठेवत आहे. खासगी लॅबमधील रिपोर्टवर विश्वास ठेवायला तयार नसल्याने गोंधळाची स्थिती आहे.

नगरपंचायत प्रशासनाला धूरळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील 12 दिवसांपासून शहरामध्ये फवारणी सुरू आहे. तसेच हा विषय जिल्हा नियोजन समितीच्या सभेमध्ये पालकमंत्र्यांसमोर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात केवळ 75 रुग्ण असल्याचे सांगितले. आमदार रणजित कांबळे यांनी एवढे रुग्ण एका खेड्यात आहेत, असे सांगत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.