धारावीत खळबळ! कबड्डीपटूची स्टंप डोक्यात घालून हत्या, एकास अटक….

हिरामण गोरेगावकर

 २४ जुलै, धारावी

मुंबई : धारावीतील कामराज नगर येथील २६ वर्षीय कबड्डीपटूची शुक्रवारी सायंकाळी पूर्व वैमनस्यातून हत्या करण्यात आली. मृत विमलराज नाडर याच्या पश्चात आई-वडील व भावंडे असा परिवार आहे. पोलिसांनी आरोपी मल्लेश चितकंडी (३२) याला या हत्येप्रकरणी अटक केली आहे. धारावी पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोकांनी येऊन निदर्शने केली. त्यांनी या प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी धारावी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

धारावी पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून मृत विमलराज नाडर याला मध्यरात्री  ३ वाजताच्या सुमारास त्याच्या परिसरात राहणाऱ्या मल्लेश चितकंडी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून लाकडी स्टंपने डोक्यावर मारहाण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, सायन हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४ अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपी मल्लेश चितकंडी याला १ तर त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात अनु चौकशी केली असता सहभाग निष्पन्न झाला. नंतर त्याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here