माणगांव तालुक्यातील मुगवली गावातून एका अज्ञात इसमानी एका मुलीचे फूस लावून केले अपहरण…

विवेक काटोलकर 

माणगांव तालुका प्रतिनिधी 

मो: 77989231

माणगांव :-माणगांव तालुक्यातील मुगवली या गावातून दि.२१ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजन्याच्या सुमारास मौजे मुगवली या गावातून तिच्या राहत्या घरातून कोणत्यातरी अज्ञात इसमानी फूस लावून पिडीत मुलगी दीपिका प्रकाश म्हसके हिला पळवून नेली म्हणून फिर्यादी दगडू बाजी म्हसके वय वर्ष ७० रा मुगवली यांनी माणगांव पोलीस ठाण्यात खबर दिली

या घटनेची खबर मिळताच माणगांव पोलीसानी अज्ञात इसमाविरुद्ध माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी दीपिका प्रकाश म्हसके ही १६ वर्ष ४ महिन्याची होती वर्णन ५ फूट उंची रंग निमगोरा अंगाने मध्यम केस काळे अंगात नेसून राखाडी रंगाची जिन्स पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा टीशर्ट पायात निळ्या रंगाची सॅन्डल कपाळावर गोधलेला गोळ टिपका अशी माहिती पोलीस ठाण्यात दिली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असं की आरोपी नाव माहित नाही यांच्या विरोधात कॉ गु रजि नं २५२/२०२३ भा. द. वि कलम ३६३ नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास म. पो. स. इन्स्पेक्टर पाटील व पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here