भविष्यात पाण्याची समस्या दूर होण्यासाठी केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना ठरणार वरदान : मुख्य प्रशिक्षक कैलास चौधरी 

लक्ष्मण सोनवणे

इगतपुरी प्रतिनिधी

भरपूर पर्जन्यमान असूनही खडकाळ जमिनिमुळे पावसाचे पाणी साचत नाही पर्यायाने पाण्याअभावी शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठे हाल सोसावे लागतात. महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र शासनाने आखलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जलजीवन मिशन योजनेचे अत्यंत सकारात्मक असे परिणाम साध्य होतांना दिसत आहे.

अंमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेच्या वतीने नामपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण

केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनेचे उद्देश डोळ्यासमोर ठेऊन जागोजागी पाणी अडवल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल, शेतकऱ्यांच्या जमिनी सुपीक समृद्ध होऊन उत्पादकता वाढेल तर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबण्यास मदत मिळेल.भविष्यात पाण्याची समस्या दूर होण्यासाठी केंद्र शासनाची महत्वकांक्षी जलजीवन मिशन योजना ठरणार वरदान ठरेल असे प्रतिपादन अंमळनेर राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे मुख्य प्रशिक्षक कैलास चौधरी यांनी केले.

सटाणा तालुक्यातील नामपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत राष्ट्रविकास अँग्रो एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले, सचिव तुषार पाटील यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी प्रशिक्षक कैलास चौधरी पाण्याचे महत्व सांगताना बोलत होते. पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी पाण्याचे श्रोत, बळकटी करण करणे, विहीर रिचार्ज तसेच शुद्ध पाणी पाण्याचा ताळेबंद, शोषखड्डे वॉटर शेड तसेच प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा प्रति व्यक्ती ५५ लिटर पाणी पुढील ३० वर्षे पाण्याचे नियोजन करणे तसेच पावसाचे वाहून जाणारे पाणी जागोजागी अडवल्यास जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल भविष्यात पाण्याची समस्या कुठेही जाणवणार नाही. यापुढील काळात पैशाप्रमाणेच पाण्याचाही वापर करावा लागणार असल्याचे मुख्य प्रशिक्षक चौधरी यांनी सांगितले.

बापूराज खरे किरण बोरकर, किशोर बागुल, आकांक्षा कोठावदे, शितल ठाकरे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, क्षमता बांधणी तज्ञ तथा जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या माधवी पोळ यांनी जलजीवन प्रशिक्षणात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here